|
भूर्जकुल, बेच्युलेसी भूर्ज, हॅझेल, कुनिस इत्यादी द्विदलिकित प्रारंभिक (किंवा ऱ्हसित) वनस्पतींचे कुल. याता अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) सर्वसाधारणपणे केला जातो. तत्पूर्वी नतकणिश गणात (ऍमेटिफेरी) किंवा ओक गणात (क्कर्सिफ्लोरीत) केला जात असे. प्रमुख लक्षणे - वृक्ष किंवा क्षुपे, एकलिंगी फुले एकाच झाडावर असून पुं-पुष्पे छदयुक्त, परिदले लहान रंगहीन व पुं-फुलोरा लोंबते कणिश, स्त्री फुलोरा उभा, स्त्री पुष्पात अधःस्थ द्विपुटक किंजपुट, किंजले दोन, प्रत्येक कप्यात एकच लोंबते बीजक, वायुपरागण, एकबीजी कपाली फळ Amentiferae.
|