|
संकेश्वर (शंकेश्वर) कुल, सीसॅल्पिनिएसी संकेश्वर, सागरगोटा, दिवी-दिवी, पतंग, टाकळा, तरवड, चिंच, बाहवा, कांचन, लाल अशोक इत्यादी कमीजास्त परिचित व द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश इतर दोन (शिरीष कुल व पलाश कुल) कुलांसह शिंबी गणात (लेग्युमिनोजी) केला जातो, गुलाब कुलासह शिंबी कुलाचा व इतर काहींचा अंतर्भाव अद्यापही (रोजेलिंझ) गुलाब गणात केलेला आढळतो व शिंबी कुलात वर वर्णन केलेल्यांना उपकुले समजतात. संकेश्वर कुलाची प्रमुख लक्षणे - वृक्ष व क्षुपे, क्वचित साधी पण बहुधा पिच्छाकृती विभागलेली पाने, फुले बहुधा आकर्षक व काहीशी एकसमात्र, पंचभागी, संदले व प्रदले सुटी, केसरदले दहा, किंजदले एक, ऊर्ध्वस्थ व एक कप्याचा किंजपुट, बिया अनेक लताकरंज (सागरगोटा) कुल असेही नाव या कुलाला दिलेले आढळते. Caesalpinioideae
|