|
चक्रवर्त (चाकवत) चंदनबटवा, बीट, पालक, मायाळ (मयाळ, वेलबोंडी) इत्यादी द्विदलिकित वनस्पतीचे कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी सेंट्रोस्पर्मी गणात, बेसीनी पाटलपुष्प (कॅरिओफायलेलीझ) गणात आणि हचिन्सननी चक्रवर्त गणात (चिनोपोडिएलीझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- अनेक लवणवासी वनस्पती, बहुतेक औषधी, मांसल, क्वचित पर्णहीन, लहान, नियमित, एकावरणी, अवकिंज, बहुधा द्विलिंगी, पंचभागी फुले, परिदलसंमुख केसरदले, एक कप्याचा, दोन किंवा तीन जुळलेल्या किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, एकबीजी, कपाली फळ, चिरस्थायी परिदलांनी वेढलेले असते. अलिकडे मयाळाचा समावेश मयाळ (उपोदकी) कुलात (बॅसेलेसी) केला जातो. Basellaceae
|