|
कंचट कुल, कॉमेलिनेसी कंचट (कोशपुष्प) केना, कानवला इत्यादी एकदलिकित लहान औषधीय वनस्पतींचे कुल, याचा समावेश एंग्लर व प्रँटल यांनी फॅरिनोजीमध्ये (गणात) व बेंथॅम व हूकर यांनी कॉरोनॅरी या श्रेणीत केला असून हचिन्सन यांनी कॉमेलिनलीझमध्ये (कंचट गणात) केला आहे. प्रमुख लक्षणे - संधियुक्त खोड व एकाआड एक पानांच्या लहान वनस्पती, पानांचा तळ खोडास वेढणारा, फुले बहुधा नियमित व द्विलिंगी, फुलोरा वृश्चिकाभ, संदले व क्वचित जुळलेली प्रदले प्रत्येकी पाच, केसरदलांची प्रत्येकी पाचंआची दोन मंडले, कधी वंध्य केसरदले व कधी काहींचा अभाव, ऊर्ध्वस्थ किंजपुटांत २- कप्पे व अक्षवर्ती, २- सरळ बीजके, बोंडात सपुष्प बिया व त्या कधी अध्यावरणयुक्त Liliales Liliaceae
|