|
घायमारी कुल, क्रॅसुलेसी घायमारी, पानफुटी (पर्णबीज) कलांचो इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव गुलाब गणात (रोजेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - मरुवनस्पती, मांसल अवयव असलेल्या औषधी व क्षुपे, फुलोरा कुंठित, नियमित, द्विलिंगी, समभागी फुले, ऊर्ध्वस्थ किंजपुट, किंजदले सुटी किंवा जुळलेली, फळ शुष्क पेटिकेसारखे, कॉटिलेडॉन, क्रॅसूला, सेडम, सेंपरव्हायव्हम इत्यादी वंशांचा यातच समावेश आहे.
|