|
मुस्तक (मुस्ता, मोथा) कुल, सेजीस, सायपेरेसी लव्हाळा, मोथा, कुंदा, कचेरा इत्यादी गवतासारख्या दिसणाऱ्या एकदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश तृण कुलाबरोबर तृण गणात (ग्रॅमिनेलीझ) केला जातो. हचिन्सन यांनी मात्र मस्तक गण (सायपेरेलीझ) स्वतंत्र करून त्यात मुस्तक कुल समाविष्ट केले आहे. तृणकुलाशी याचे आप्तभाव असून अनेक लक्षणांत दोन्ही कुलांत साम्य आहे. प्रमुख लक्षणे- मुस्तक कुलात खोड भरीव व त्रिधारी, पाने तीन रांगांत, जिव्हिकाहीन पानांचे तळ खोडाशी पूर्णपणे वेढतात, परिदले केसाप्रमाणे व फुले दोन्ही कुलात तुसांनी संरक्षित असतात. तसेच ती अवकिंज व एकलिंगी, केसरदले तीन, किंजदले दोन किंवा तीन पण किंजपुटात एकच कप्पा व बीजक, शुष्क व एकबीजी फळात बीजावरण फलावरणापासून अलग Gramineae Sedges
|