|
द्विदलिकित, द्विबीजपत्री दोन दलिका (डाळिंब्या) असलेलं (बीज) उदा. पावटा, मोहरी, आंबा इत्यादी. अशी बीजे असलेल्या सर्व वनस्पतींना हेच विशेषण सामान्यपणे लावतात. द्विदळ अशी संज्ञा सामान्यपणे रुढ आहे. ह्या वनस्पतींची इतर प्रमुख लक्षणे - पानांमध्ये शिरांचे जाळे, खोडात सतत वाढणाऱ्या वाहक वृंदाचे वर्तुळ, बहुवर्षीय वनस्पतीत द्वितीयक वृद्धी, फुलातील प्रत्येक मंडलात ४- पुष्पदले, फळे व बीजे विविध प्रकारची उदा. निंब,पिंपळ, बाभूळ, साग d. embryo द्विदलिकित गर्भ दोन दलिका (डाळिंब्या) असलेला गर्भ, पहा cotyledon
|