|
करंबळ कुल, डायलेनिएसी करंबळ, करमळ इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लरच्या पद्धतीत याचा समावेश पराएटेलीझ गणात व हचिन्सन यांना याचा अंतर्भाव करंबळ गणात (डायलेनिएलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, झुडुपे कधी वर चढणारी, जाड एकाआड एक पाने व कुंठित फुलोऱ्यावर द्विलिंगी, अवकिंज फुले, सदले ३- किंवा अनेक व सर्पिल आणि फळावर सतत राहतात. पाकळ्या ३- व सुट्या, केसरदले अनेक, तसेच किंजदले ते अनेक, सुटी किंवा जुळलेली व बीजकेही एक किंवा अनेक. मृदुफळ किंवा पेटिकाफळ, सपुष्क बीजावर बीजोपांग.
|