-
वि. १ स्वच्छ ; निर्मळ . २ निर्दोष ; पवित्र ; निष्कलंक ; निष्कपट . ३ रोगांश , अपूर्णत्व , व्यंग इ० पासून मुक्त ; अव्यंग ; निरोगी ( शरीर , अवयव , प्राणी , पदार्थ इ० ). ४ गुळगुळीत ; एकसारखा ; अविषम ; सरळ ; नीटनेटका ; व्यवस्थित ( काष्टपाषाण , बांधकाम , तयार केलेली वस्तु इ० ). ५ सरळ ; गूढार्थ , वक्रोक्ति , संदेह इ० दोष नसलेलें ( भाषण , लेख , प्रबंध ). ६ उघड ; स्पष्ट . - क्रिवि . १ निखालसपणें ; बेधडक ; स्वच्छपणें ; उघडपणें ( बोलणें , उत्तर करणें ). २ पुरतेपणीं ; सर्व ; एकंदर , अगदीं ( जळणें , भिजणें , करणें ). मी पावसानें साफ भिजलों . ३ मुळींच ; बिलकूल . मला साफ दिसत नाहीं . - विसरुनि चोरांना साफ । असेच कर तूं आलाप । - टिक १६३ . ४ स्वच्छ ; चांगल्याप्रकारें . तेथून समुद्रही साफ दिसतो . - पाव्ह ३७ . [ अर . साफ् ]
-
०करणें १ स्वच्छ करणें ; धुणेंपुसणें . २ छाटून टाकणें . जो आढळेल त्यास पाहतांच त्याचे कान व नाक साफ करीत जावें . - रा ५ . ६६ .
-
०सफा वि. १ स्वच्छ आणि निर्मळ . २ गुळगुळीत आणि तजेलदार . ३ नीटनेटका . साफ पहा .
-
०सफाई स्त्री. १ तजेला ; चकाकी ; मऊपणा . २ साफसुफी ; स्वच्छता .
Site Search
Input language: