|
अपितल गर्भपूर्वावस्थेतील रंदुकाचा वरचा अर्ध, इतर काही अवयवांच्या टोकाकडील अर्धा भाग e. cell अपितल कोशिका शेवाळी व नेचाभ वनस्पती यातील रंदुकाच्या पहिल्या विभागणीनंतरची (रंदुकातील) वरची कोशिका e. octant अपितल अष्टम रंदुकाच्या विभागणीत त्याच्या आठ सारख्या भागांपैकी वरच्या चार भागातील एक भाग (एक अष्टमांश) e. blema मूलत्वचा कोवळ्या मुळाच्या पृष्ठभागावरील कोशिकांचा थर, यात मूलत्राणाचा अंतर्भाव नसून केवल मूलकेश असतात, तसेच उपत्वचा व रंधे यांचा अभाव असतो. पहा epidermis e. calyx अपिसंवर्त संवर्ताखाली असलेले छदांचे वर्तुळ उदा. कापूस, जास्वंद, भेंडी इ. येथे संवर्त या मंडलावर असतो. e. carp बाह्यकवच फळाचे सर्वात बाहेरचे आच्छादन, कवठ, बेल व गोरखचिंच इत्यादींचे हे आवरण कठीण असते. e. cotyl अप्याक्ष द्विदलिकित बी रुजून त्यातून नवीन रोप बनते, त्याच्या दलिकांच्या वरच्या बाजूकडील प्रारंभिक अक्षाचा भाग पहा hypocotyl. e. dermal tissue system अपित्वचा तंत्र अपित्वचा व त्याशी संलग्न असलेली उपांगे, छिद्रे, केस इ. e. dermis अपित्वचा नेचाभ पादप व बीजी वनस्पती (सर्व वाहिनीवंत) ह्यांच्या शरीरांच्या सर्व अवयवांवर (अपवाद- जमिनीतील मुळे) असलेला सर्वांत बाहेरचा प्राथमिक कोशिकाथर, यावर उपत्वचेचा लेप, केस, रंधे इत्यादी परिस्थितिनुसार किंवा गरजेप्रमाणे कधी कधी आढळतात. e. geal अपिभौम बी रुजण्याचा एक प्रकार, बी रुजल्यावर दलिका जमिनीवर येऊन बहुधा हिरव्या बनतात व काही वेळ अन्ननिर्मिती करतात पहा hypogeal e. gynous अपिकिंज किंजमंडल खालच्या पातळीवर (अधःस्थ) राहून बाकीची पुष्पदले वरच्या पातळीवर येतात, तो प्रकार, येथे पुष्पस्थली किंजपुटाला पूर्णपणे वेढून राहते. उदा. पेरु, काकडी, निशिगंध यांची फुले पहा hypogynous, perigynous e. nasty अपिवर्धन एखाद्या अवयवाचा वरचा पृष्ठभाग (प्रकाशाकडे असलेली बाजू) अधिक वेगाने वाढून तो अवयव वळण्याचा प्रकार, उदा. फुलाची कळी उमलताना संदले व प्रदले या प्रकारे वळतात. याउलट प्रकार कळीची वाढ होते त्यावेळी असतो पहा hyponasty, nastic movement e. ptalous अपिप्रदललग्न, प्रदललग्न पाकळीच्या कमीजास्त प्रमाणात चिकटलेले (केसरदल) उदा. धोत्रा. e. phyllous अपिदललग्न, परिदललग्न पर्णेआपरिक परिदलाला वरप्रमाणे चिकटलेले (केसरदल) उदा. केशर, नागदमनी, भुईचाफा पानांचा फक्त आधार घेऊन त्यावर वाढणारी (वनस्पती) उदा. काही शैवले e. phyte अपिवनस्पती, अपिपादप दुसऱ्या वनस्पतीवर फक्त संपूर्ण आधार घेणारी वनस्पती उदा. आमरे, शेवाळी, दगडफुले, नेचे, गवते, शंखपुष्पी ह्यांपैकी काही जाती e.phytic habit अपिवनस्पति वृत्ति, अपिवृत्ति सतत दुसऱ्या वनस्पतीवर पूर्ण आधार घेण्याची रीत, अनेक दगडफूल (शैवाक) पहा Lichen e.plasm अपिप्राकल बीजुककोशात बीजुके तयार होऊन शिल्लक राहिलेले (मधुजन युक्त) जीवद्रव्य (प्राकल) उदा. काही कवक e.podium (blade) पाते, पत्र पूर्ण विकसित पानाच्या अक्षाचा पसरट भाग e.sepalous अपिसंदललग्न, संदललग्न संदलाला कमीजास्त प्रमाणात चिकटून वाढलले (केसरदल) उदा. रंगूनचा वेल, लाल अशोक इ. e.sperm( perisperm) परिपुष्क पुष्काभोवती असलेल्या ऊतकापासून (प्रदेह) बीजामध्ये बनलेला व कायम राहिलेला अन्नसाठा उदा. कर्दळ, कमळ इ. e.spore अपिबीजुक बीजुक व रंदुक याभोवती परिप्राकलापासून बनलेला आच्छादक थर उदा. काही कवक व काही बीजुके e.statis संनियंत्रण एकाच वैकल्पिक गुणयुगुलात नसलेल्या परंतु वनस्पतीच्या एकाच लक्षणाशी संबंधीत अशा दोन भिन्न घटकांपैकी एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडण्याची घटना. मेंडेलच्या सिद्धांताप्रमाणे असाच प्रभाव एकाच वैकल्पिक गुणयुगुलातील दोन घटकांपैकी एकाचा दुसऱ्यावर पडतो. प्रथम सांगितलेल्या घटनेतील अप्रकट घटक दुसऱ्या तशाच अप्रभावीशी संबंध आल्यास प्रभावी ठरतो, म्हणजेच पहिल्या घटनेत दोन भिन्न वैकल्पिक जोडीतील प्रभावीपैकी एक अधिक प्रभावी ठरतो, तो संनियंत्रक (epistatic) असून ज्याच्यावर प्रभाव पडतो त्याला संनियंत्रित (hypostatic) म्हणतात. e.strophe संमुखावस्था अंधुक प्रकाशाच्या चेतनेमुळे कोशिकेतील हरितकणूंची प्रकाशासमोरच्या कोसिकाभित्तीजवळ उपस्थिती, प्रकाशाकडे जाणे (चलन) असाही अर्थ अभिप्रेत आहे (संमुख चलन) पहा a postrophe e.thelium अपिस्तर शरीरातील पोकळीभोवती असलेला अनेक कोशिकांच्या जाडीचा थर e. them. जलस्त्रावक पानातील पाणी बाहेर टाकण्यात वैशिष्ट्य पावलेल्या हरित्कणुहीन कोशिकांचा समूह (ऊतक) पाणी बाहेर जाण्याकरिता विशिष्ट छिद्र (जलरंध) असून ही सर्व संरचना वाहक वृंदाच्या टोकास असते. उदा. अंजनवेल पहा hydathode e. thet गुणनाम वनस्पतींना लॅटिन भाषेत अधिकृत नाव देण्यात ज्या वंशातील ती वनस्पती असेल त्या वंशाचे नाव प्रथम ठेवून त्यापुढे त्या वनस्पतीचा विशेष (इतरांपासून ती वनस्पती ओळखली जाईल असा) गुणवाचक शब्द लिहितात, असे गुणवाचक नाम त्या वंशातील दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीस दिले जात नाही, हा गुणवाचक शब्द (अंतिम निर्देशक) कधी एखाद्या थोर व्यक्तीच्या किंवा देशाच्या नावाशी निगडित असतो, गुणवाचक शब्द हा मनुष्यांच्या व्यक्तिगत नावाप्रमाणे व वंशवाचक शब्द आडनावाप्रमाणे उपयोगात असतो. उदा. Polyalthia longifolia (हिरवा अशोक) यातील दुसरा शब्द गुणनाम असून P. longifolia var. pendula या नावातील तिसरा शब्द प्रकारदर्शक गुणनाम मानतात. hypobasal zygote (oospore)
|