|
वालुक कुल, फायकॉइडी (फायकॉइडेसी, ऐझोएसी) वळू (वालुक) झरस, धाप, वसू, दसरा साग इ. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अंतर्भाव करणाऱ्या द्विदलिकित फुलझाडांचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव हचिन्सन यांनी फायकॉइडेसी नावाने पाटलपुष्प गणात (कॅरिओफायलेलीझमध्ये) केला असून एंग्लर व प्रँटल यांनी ऐझोएसी या नावाने आणि बेंथम व हूकर यांनी फायकॉइडी या नावाने फायकॉइडेलीझमध्ये केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- औषधी व उपक्षुपे, बहुधा साधी, मांसल, कधी लहान खवल्यासारखी पाने, पाकळ्या नसलेली, अरसमात्र, बहुधा नियमित, द्विलिंगी फुले, सुटी किंवा जुळलेली व किंजपुटास चिकटलेली संदले, मूलतः पाच परंतु विभागून अनेक झालेली केसरदले, बाहेरची वंध्य व पाकळ्यासारखी, तीन ते पाच दलांचा, परंतु एक संयुक्त किंजपुट, क्वचित एकच बीजक, बोंडात किंवा मृदुफळात एक किंवा अनेक, सपुष्क कधी अपुष्क, बिया. वसू (Trianthema monogyna L.) वळू (वालुक = Gisekia pharnecioides L.) Ficoidaceae Aizoaceae
|