|
व्यजनपर्ण वृक्ष (कन्याकेश वृक्ष) गण, गिंकोएलीझ मध्यजीव महाकल्पातील प्रकटबीज वनस्पतींचा एक गण, यामध्ये गिंकोएसी हे एकच कुल व गिंको बायलोबा ही एकच जाती, प्रमुख लक्षणे- विभक्तलिंगी वृक्ष, ऱ्हस्व व दीर्घ प्ररोह असतात. पंख्यासारखी पाने (व्यजनपर्ण) व त्यात द्विशाखाक्रमी शिरांची मांडणी, ती पाने तळाशी पाचरीसारखी व टोकास विभागलेली, मेडन हेअर फर्न या नावाच्या नेचाशी पानांचे साम्य असल्याने या वृक्षाला मेडन हेअर टी (कन्याकेश वृक्ष) म्हणतात. तसेच पंख्यासारख्या पानांच्या आकारामुळे व्यजनपर्ण वृक्ष असेही म्हणतात. लघुबीजुकपर्णे लोंबत्या कणिश फुलोऱ्यावर (शंकूवर) सर्पिल प्रकारे मांडलेले, गुरुबीजुके धारण करणाऱ्या शंकूवर फक्त एक देठ व त्यावर दोन अनावृत (प्रकट, नग्न) बीजके असतात, रेतुके चलनशील Gymnospermae
|