|
घातकी (धायटी) कुल, लिथेसी घातकी (धायटी) मेंदी, बोंडारा, तामण इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टेलिझ, मिर्टिफ्लोरी) करतात, तथापि हचिन्सन यांनी घातकी गण (लिथेलींझ) या स्वतंत्र गणात घातकी कुलासह, दाडिम कुल व शृंगाटक कुल यांचाही समावेश केला आहे. पूर्वीच्या जंबुल गणात जंबुल कुल, कांदल कुल, शृंगाटक कुल, धातकी कुल, दाडिम कुल व अर्जुन कुल ही पाच समाविष्ट होती. प्रमुख लक्षणे- वृक्ष, क्षुपे, औषधी, साधी समोरासमोर पाने, द्विलिंगी, नियमित किंवा एकसमात्र, ४- भागी फुले, पाकळ्या क्वचित नसतात, केसरदले कमीजास्त संख्येने संवर्त नलिकेवर आधारलेली, तीन ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या २- कप्पे व त्यात अनेक बीजके, बोंडात अपुष्क बिया, मेंदीची पान रंगाबद्दल व फुले हिना अत्तराबद्दल प्रसिद्ध असल्यामुळे या कुलाला मेंदी (मेंदिका किंवा मेहेंदी ) कुल असेही म्हणतात. Myrtales
|