|
दीर्घ-, गुरु-, बृहत् लांबटपणा किंवा मोठा आकार दर्शविणारा उपसर्ग m.cladous दीर्घशाखी लांबट फांद्या असलेली वनस्पती m.conidium गुरु विबीजुक जीवनचक्रातील दोन विबीजुकांपैकी मोठे पहा conidium m. cyst गुरुकोष्ठ मोठ्या आकाराचे कवच, पहा cyst m. fungus गुरुकवक, बृहत्कवक मोठ्या आकाराचे कवक m. gamete (megagamete) गुरुगंतुक, स्त्रीयुग्मक दोन प्रजोत्पादक कोशिकांपैकी मोठी (बहुधा स्त्रीलिंगी) m. gametophyte गुरुगंतुकधारी मोठी गंतुके (बहुधा स्त्रीलिंगी) बनविणारी जीवनचक्रातील अवस्था पहा gametophyte m, gonidium गुरु बीजुक दोन्हीपैकी मोठे बीजुक पहा spore m. nucleus गुरुप्रकल एका कोशिकेतील दोन प्रकलापैकी मोठे प्रकल m. phyllous गुरुपर्णी, बृहत्पर्णी मोठ्या पानाची (जाती किंवा वनस्पती) उदा. काही नेचे, दिंडा (Leea macrophylla Roxb.) घोटवेल (Smilax macrophylla Roxb.) m. phyte दीर्घदेही वनस्पति, गुरुपादप लांबट किंवा मोठ्या शरीराची वनस्पती m. phytoplankton गुरुपादप प्लवक पाण्यात तरंगणाऱ्या मोठ्या वनस्पतींचा समूह, उदा. गोंडाळ, ऑटेलिया, कुमुद, पोटॅमोजेटॉन, हायड्रिला, नायास, सालव्हीनिया, ऍझोला इ. m. sclereide गुरुकठक लंबगोल, बोथट टोकाची व जाड आवरणाची कठिण कोशिका पहा sclerenchyma m. scopic स्थूलमानीय, नेत्रदर्शी, दृष्टिगोचर सहज साध्या डोळ्यांनी दिसणारे, सूक्ष्म नसलेले m. sporangiate गुरुबीजुककोशिक गुरुबीजुककोश असणारे (पान, वनस्पती) m. sporangium गुरुबीजुककोश गुरुबीजुके बनवून पुढे ती मुक्त करणारा पिशवीसारखा अवयव उदा. सिलाजिनेला, आयसॉएटिस, बीजक पहा ovule m. spore गुरुबीजुक निर्लिंग पद्धतीने बनलेला प्रजोत्पादक व एककोशिक सूक्ष्म भाग, यापासून स्त्री गंतुकधारी व स्त्री गंतुके बनतात पहा embryo-sac. m. sporophyll गुरुबीजुकपर्ण गुरुबीजुककोश (व त्यातील गुरुबीजुके) बनविणारे पान अथवा तत्सम अवयव (उपांग) पहा carpel m. stylous दीर्घकिंजली लांब किंजल असलेले, उदा. फूल m. thermophilous दीर्घाएष्णताप्रिय उष्ण प्रदेशातील (वनस्पती) m. zoospore गुरुचरबीजुक हालचाल करणारे दुसरे मोठे बीजुक mega
|