|
अंजनी कुल, मेलॅस्टोमेसी लाखेरी, लोखंडी, अंजनी इत्यादी वनस्पतींचे (द्विदलिकित) कुल. याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे-समोरासमोर किंवा झुबक्यांनी (वर्तुळात) साधी पाने असलेल्या औषधी किंवा झुडपे अथवा लहान वृक्ष, फुले आकर्षक, नियमित, तीन किंवा अनेकभागी, केसरदले, संदले किंवा प्रदले यांच्या दुप्पट, किंजदले जुळलेली व तितकीच, मृदुफळ किंवा बोंड, बिया अपुष्क व अनेक
|