|
शिग्रु (शेवगा) कुल, मोरिंगेसी शोभांजन अथवा शेवग्याच्या एका द्विदलिकित वनस्पतींच्या वंशातील फक्त तीन जातींचा समावेश असलेले लहान प्रतिरुपी कुल. याचा अंतर्भाव हचिन्सन यांनी वरुण गणात (कॅपॅरिडेलीझमध्ये) केला आहे. एंग्लर व प्रँटल यांनी ऱ्हीडेलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे पानझडी वृक्ष, पाने संयुक्त व मोठी, फुले, द्विलिंगी, एकसमात्र, पंचभागी, पाच वंध्य केसर, किंजधरावर ऊर्ध्वस्थ, तीन जुळलेल्या किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा, तटवर्ती बीजकाधानी, बीजके अनेक, बोंडात अनेक अपुष्क बीजे, लांबट बोंडाला सामान्य भाषेत शेंग म्हणतात. ती शिंबा नव्हे. legume
|