|
कट्फल कुल, मिरिकेसी कायफळ (कट्फल) ह्या द्विदलिकित फुलझाडाचा व त्याच्या वंशातील इतरांचा आणि शिवाय इतर दोन वंशांच्या जातींचा (एकूण जाती पन्नास) अंतर्भाव करणारे लहान कुल, हचिन्सन (व एंग्लर) यांच्या पद्धतीत मिरिकेलीझ या स्वतंत्र गणात अंतर्भाव असून इतर शास्त्रज्ञ अक्रोड गणात (जुग्लँडेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे- सुगंधी वृक्ष, झुडुपे, पाने साधी, ताठर कमी जास्त विभागलेली, पानांच्या बगलेत विविध प्रकारचे बहुधा लोंबते कणिश प्रकारचे फुलोरे, फुले एकलिंगी, एकत्र किंवा विभक्त, परिदले नसतात, केसरदले २-२०, तंतू जुळलेले, किंजदले दोन, जुळलेली ऊर्ध्वस्थ, किंजपुट व फळ आठळीयुक्त, एकच बी, कायफळ (Myrica nagi) ही एकच जाती भारतात आढळते. Juglandales.
|