|
- पारिजातक कुल, ओलिएसी
- ऑलिव्ह, करंबा (इंडियन ऑलिव्ह)
- पारिजातक, जाई, जुई, चमेली इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा
अंतर्भाव किराइत गणात (जेन्शिएनेलिझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे -
काष्ठयुक्त, काही वेली, क्वचित औषधीय, पाने साधी, समोरासमोर, क्वचित
संयुक्त, पिसासारखी, द्विलिंगी किंवा एकलिंगी, नियमित व २-भागी फुले,
पुष्पमुकुट सुट्या किंवा जुळलेल्या पाकळ्यांचा, क्वचित अभाव,
पाकळ्यास चिकटलेली दोन केसरदले, दोन जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या
किंजपुटात एक किंवा अनेक बीजके, फळे मृदु, आठळीयुक्त किंवा बोंड, अपुष्क
बीजे.
|