|
शृंगाटक (शिंगाडा) कुल, ऑनेग्रेसी फुक्सिया, शिंगाडा, पाणलवंग, ईनोथेरा, केसर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश बेसींनी जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) व हचिन्सन यांनी मेंदी गणात (लिथेलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- एकाआड एक, समोरासमोर किंवा झुबक्यात, बहुधा साध्या पानांच्या औषधी, कधी कधी झुडपे व वृक्ष, द्विलिंगी व बहुधा नियमित फुले, संदले व पाकळ्या २- व सुट्या, पाकळ्या क्वचित नसतात, केसरदले ४- सुटी व किंजदले बहुधा चार व अधःस्थ किंजपुटात ते अनेक बीजके, फळ (बोंड, कपाली, मृदु) अपुष्क बीजे किंवा थोडा पुष्क असतो.
|