Dictionaries | References
o

Orchidaceae

   
Script: Latin

Orchidaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
आमर कुल
ऑर्किडेसी

Orchidaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
आमर कुल, ऑर्किडेसी
आकर्षकपणामुळे व कधी सुगंधामुळे परिचित (सुप्रसिद्ध) असलेल्या एकदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव आमर गणात (ऑर्किडेलीझ) हल्ली करतात. (पूर्वी मायक्रोस्पर्मी श्रेणीत). प्रमुख लक्षणे- बहुवर्षायु औषधी कधी अपिवनस्पती, द्विलिंगी, एकसमात्र, सम (किंवा विषम) परिदली, मंडलित, त्रिभागी व जटिल संरचनेची फुले, केसरदले एक किंवा दोन असून किंजलाशी जुळलेले (किंजकेसराक्ष)
पराग पुंजामध्ये, तीन अधःस्थ किंजदलांच्या व एका कप्प्याच्या किंजपुटात अनेक सूक्ष्म बीजके, बोंडात अपुष्क बीजे. तीन किंजल्कापैकी एक रुद्ध. सालममिश्री हे एका आमराच्या फळापासून काढतात व काही खाद्य पदार्थात स्वादाकरिता घालतात. रुद्ध किंजल्काला चंचुक म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP