|
केतकी कुल, पडनसा केवडा (वंश- पँडॅनस) सारारंगा व फेसिनेशिया या तीन वंशांतील सुमारे २२ जातींचा समावेश करणारे एकदलिकित कुल, यांचा समावेस पँडॅनेलीझ गणात करतात. प्रमुख लक्षणे- बहुधा पाणथळीत वाढणाऱ्या व वायवी मुळांनी आधारलेल्या काष्ठमय वनस्पती, कधी वेलीप्रमाणे चढणाऱ्या, कधी शाखायुक्त, एकाआड एक, लांब, अरुंद, काटेरी कडा असलेली व तळाशी खोडास वेढणारी पाने तीन रांगांत असतात. फुलोरा टोकास व तळाशी छदे, स्थूलकणिश, नग्न फुले फार लहान व एकलिंगी, नर फुलात अक्षावर फक्त अनेक केसरदले, स्त्री पुष्पात अनेक किंजदलांच्या वर्तुळाने बनलेल्या एक किंवा अनेक कप्प्याच्या किंजपुटात एक ते अनेक बीजके, किंजले नसतात, मृदुफळ किंवा आठळीफळ किंवा यांचे बनलेले संयुक्त फळ, पुष्क तेलकट.
|