|
कृष्णकमळ कुल, पॅसिफ्लोरेसी कृष्णकमळ, पॅशनफुट, ऍडेनिया पामॅटा इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे एक लहान कुल, हल्ली याचा अंतर्भाव कृष्णकमळ गणात (पॅसिफ्लोरेलीझमध्ये) करतात. तत्पूर्वी पराएटेलीझमध्ये (एंग्लर व प्रँटल यांनी) केला होता. कृष्णकमळाच्या वंशात (पॅसिफ्लोरामध्ये) सुमारे पाचशे जाती असून त्या कुलात एकूण बारा वंश व सहाशे जाती आहेत. प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आहे. प्रमुख लक्षणे- बहुतेक जाती औषधी, झुडपे किंवा पानांच्या बगलेतील तणावे असलेल्या वेली, पाने साधी, खंडयुक्त, एकाआड एक व उपपर्णयुक्त, फुले एकेकटी किंवा वल्लरीवर येतात, फुले नियमित, द्विलिंगी किंवा एकलिंगी, फुलात केसरधर किंवा किंजधर आढळते, कधी पाकळ्या नसतात. संदले, प्रदले, केसरदले ३-५, केसरदले कधी १०, तीन ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व तटलग्न अनेक बीजके, मृदुफळ किंवा बोंड, बियांवर अध्यावरण
|