|
तिल कुल, पेडॅलिएसी तीळ (तिल). रानतीळ, मोठे गोखरु इत्यादि द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल, बेंथॅम व हूकर यांनी मार्टीनिएसीचा (वृश्चन कुलाचा) अंतर्भाव या कुलात केला असून तिलकुल पर्साएनेलीझ गणामध्ये समाविष्ट केले आहे.प्रमुख लक्षणेः प्रपिंडीय केस असलेल्या औषधी, फुले द्विलिंगी, असमात्र, संदले व प्रदले प्रत्येकी पाच, केसरदले किंवा ४ः किंजदले किंवा ३-४, बीजके अनेक, किंजपुटात २- कप्पे, अक्षलग्न बीजकविन्यास, बोंड किंवा कपाली प्रकारचे फळ, बिया सपुष्प, तीळ (sesamum indicum L.)
|