|
मोरवेल कुल, रॅनन्क्युलेसी काळे जिरे, बाळकडू, मोरवेल, अतिविष, बचनाग इत्यादी वनस्पतींचे (द्विदलिकित) कुल, याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे- औषधीय वनस्पती, बहुधा विभागलेली पान, द्विलिंगी, नियमित, क्वचित एकसमात्र फुले, सर्पिल ते चक्रीय परिदले, क्वचित संदले व प्रदले भिन्न, केसरदले अनेक, किंजदले ऊर्ध्वस्थ, एक ते अनेक, सुटी, बीजके एक, बोंड किंवा पेटिका फळ, क्वचित मृदुफळ, बिया तेलकट व पुष्कयुक्त
|