|
चंदन कुल, सॅटॅलेसी या चंदनाच्या कुलाचा समावेश चंदनगणात (सॅटॅलेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- अर्धवट दुसऱ्या वनस्पतीवर जगणाऱ्या वनस्पती (औषधी, झुडपे, व वृक्ष) पान साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, फुले द्विलिंगी किंवा एकलिंगी, सारख्या परिदलाची, परिकिंज किंवा अपिकिंज बिंब, परिदले २+ किंवा २+ ३, तितकीच त्यावर आधारलेली केसरदले, अधःस्थ किंजपुटात एकच कप्पा व त्यात १- बीजके, कपाली किंवा आठळीफळ, एकबीजी, सपुष्क बीज.
|