-
पु. १ वजन करणे ; वजन करण्याची क्रिया . २ वजन करुन पदार्थांचे समजलेले मान , परिमाण . ३ कल ; झोंक . राधेयपताकेचा होता मागेचि तेधवां तोल । - मोकर्ण ७ . ४० . ४ ( कांही जिन्नस तोलतांना ) गिर्हाइकांस हवा असेल तेवढ्या वजनाचा जिन्नस देऊन लोकरीतीप्रमाणे आणखी थोडासा जिन्नस वर देतात तो . ५ ( सामा . ) तुलना ; बरोबरी ; तुलनेस , जोडीस जुळणे ; समानता . मालोजीस मनसब देऊन तुमच्या तोलाचे करतो . ६ ( ल . ) महत्त्व ; मोठेपणा ; वजनदारी ; भारदस्तपणा . राष्ट्राचा केवल तोल । - संग्रामगीते १०८ . ७ - न . वजन करण्याचे परिमाण , माप , वजन . उदा० शेर , मण , तोळा , मासा इ० . [ सं . तुल = वजन करणे ] ( वाप्र . )
-
पु. ठराविक वजनावर घ्यावयाचा वर्ताळा . गुजराथेंत हा प्रचार आहे . - के ३१ . १० . १९३९ .
-
०देणे ( दुसर्याच्या मतास मान देऊन , आपले मत बाजूस ठेवून त्याच्या मतास ) मान्यता , अनुमति , संमति देणे ; आपला हेका सोडणे .
-
०मिळविणे ( जरतार धंदा ) वजन पडताळून पाहणे .
Site Search
Input language: