|
सहजीवन सारख्या नसलेल्या दोन किंवा अधिक सजीव व्यक्तींचे एकत्र जगणे. उदा. जीवोपजीवी वनस्पती व तिचा आश्रय. s. antagonistic विरोधी सहजीवन सहकाऱ्यात स्पर्धा असलेले सहजीवन, उदा. जीवोपजीवी (अमरवेल) व तिचा आश्रय (कडवी, डुरांटा, शेर इ.) कीटकभक्षक वनस्पती. s. conjunctive संयोजी सहजीवन दोन्ही सहजीव कायम एकत्र सांधलेले असणे. उदा.जीवोपजीवी सूक्ष्मजंतू, बुरशी (नायट्यास कारणीभूत असलेली) बांडगूळ, अमरवेल इ. s. contingent सापेक्ष सहजीवन एका वनस्पतीने दुसऱ्याच्या शरीरात फक्त आश्रय घेणे, उदा. अंतर्वनस्पती, सायकसच्या मुळात आढळणारे नॉस्टॉक (नीलहरित शैवल). s. disjunctive प्रासंगिक सहजीवन सहकाऱ्यांचा तात्पुरता संबंध असलेले एकत्र जीवन, उदा. वृक्षवेलसंबंध, हीच वेल कोठेही इतर आश्रयावर वाढू शकते, अपिवनस्पती, पक्षी व वृक्ष. s. mutualistic अन्योन्य सहजीवन परस्परांना फायद्याचे एकत्र जीवन, शैवाक (शैवल+कवक, दगडफूल) शिंबी वनस्पतीच्या मुळावरील गाठींतील सूक्ष्मजंतू, परागण घडविणारे कीटक. एs. nutritive पोषक सहजीवन एक किंवा दोन्ही सहकारी पोषणामुळे संबंधित असण्याचा प्रकार, उदा. संकवक, शैवाक इ. पहा Lichens.
|