-
वि. १ डोळे , दृष्टि शाबूत असलेला . का डोळसाचे धरुनि कर । अंधळा सत्वर चालतसे । २ ( ल . ) चतुर ; हुशार ; चलाख ; काकदृष्टीचा ; दूरवर दृष्टि पोंचविणारा ; सूक्ष्मदृष्टि ; चाणाक्ष , ज्ञान जी तुझेनि डोळस । - ज्ञा १४ . १० . ३ तीक्ष्ण दृष्टीचा . म्हणे ऐक सकुमार राजसे । चंपककळिके परम डोळसे । ४ सुंदर डोळ्यांचा . रंगा येई वो विठाई । सांवळिये डोळसे । - तुगा २८२ . ५ स्वच्छ ; प्रत्यक्ष . ते ज्ञान नोहे जाणावे । डोळस तम । - ज्ञान १८ . ५८१ . ६ ( थट्टेने ) डोळ असलेली ( डाळ , वरण इ० ). [ डोळा ] डोळसता - स्त्री . डोळे असणे ; दृष्टि . देखणेपणेवीण डोळसता । तोची माथां स्तबक । - एरुस्व १ . ६६ . डोळस वरण - वि . डोळाने युक्त अशा डाळीचे वरण .
-
क्रि.वि. काकद्दष्टीचा , खबरदार , चोखंडळ , चौकस , पारखी , बारीक नजरेने पाहणारा , सूक्ष्म द्दष्टीचा ;
-
डोळसाचे डोळे कामाचे आणि अंधळ्याचे डोळे शोभेचे
-
क्रि.वि. डोळसपणाने , उघडया डोळ्यांनी , नीट पारखून .
Site Search
Input language: