|
गोक्षुर (गोखरु) कुल, झायगोफायलेसी सराटा (गोखरु) धमासा, हरमल व लिग्नम व्हिटी इ. द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश हल्ली भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) करतात (एंग्लर व प्रँटल आणि बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीमध्ये) हचिन्सन यांनी माधवी गणात (माल्पिधिएसीमध्ये) घातले आहे. प्रमुख लक्षणे - झुडपे, समोरासमोर व कधी पिसासारखी विभागलेली, उपपर्णयुक्त संयुक्त पाने, नियमित, द्विलिंगी, ४- भागांची, बिंबयुक्त किंवा किंजधर असलेली, अवकिंज फुले, ८-१० केसरदले, तळाशी कधी उपांगयुक्त, किंजदले ४- व जुळलेली, एक ते असंख्य बीजके, फळे पालिभेदी किंवा बोंडे. Gerniaceae.
|