-
उ.क्रि. १ पराभव करणें ; पादाक्रांत करणें ; पाडाव करणें . २ जय मिळविणें ; यशस्वी होणें ; ( लढाई , खटला , खेळ यांत ). ३ कह्यांत ठेवणें ; ताबा मिळविणें ; सुटका करून घेणें ; स्वाधीन ठेवणें ( झोंप , क्षुधा , तहान , रोग ). ४ दडपणें ; दाबून टाकणें ; कांहीं चालूं न देणें ( विकार , वांछा , मनोवृत्ति , लोभ , इष्क , भोगेच्छा यांचें ). स्थानें काम जिंकला . ५ चढ करणें ; सरशी करणें ; आपल्या गुणांनीं इतर पदार्थ हलके करणें . तुझे मुखानें चंद्रशोभा जिंकली . ६ सोडविणें ; उलगडणें ; फोड करणें ; उत्तर देणें , काढणें ; करणें . ( कोडें ). ७ न्यायत : मिळविणें ; स्वत्व सिध्द करणें ( विवादास्पद किंवा इतर द्रव्य ). त्यानें पंचाइतेमध्यें दोन गांव जिंकिले . - अक्रि . १ संकटांतून मुक्त होणें ; निभावून जाणें . एवढें लग्न यथास्थित तडीस गेलें म्हणजे जिंकलें . २ पराभूत होणें ; जित होणें . जुनें रूप जिंकण्हें असें आहे . संग्रामातें जिंकण्हारू - गीता १ . ५३५ . [ सं . जी ] ( वाप्र . ) ऊब जिंकणें - अनोळखीमुळें एखाद्याच्या श्रेष्ठतेबद्दल भय वाटत असतां तें ओळखीमुळें नाहींसे होणें ; भय वाटनासें होणें ; भीति जाणें . नवा राजा झाला तेव्हां प्रजा जवळ जायाला वचकत असे पण आतां ऊब जिंकली .
-
ऊब जिंकणें
-
भीड चेपणें
-
संवय होणें
Site Search
Input language: