|
पु. पु. गोळांबरीज ; हिशोब ; एकंदरी . ( सं .) आकृति ; ठेवण ; रुप ; घडण ; मूर्ति . पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनी नादाकारु । - ज्ञा ९ . २७५ . बाह्यस्वरुप ; देखावा . ( ल . ) साम्य ; सादृश्य ; तुल्यता . मनावर ठसलेली आकृति - ठसा - मूर्ति ; मनावर झालेला परिणाम - कल्पना - ग्रह . ( पूर्णतेस येणार्या कामाच्या , धंद्याच्या किंवा योजलेल्या गोष्टीच्या , मसलत इ० च्या ) स्वरुपाचा निश्चितपणा . खर्च , नफा , उत्पन्न , वसूल इत्यादि गोष्टींचा अजमास - अंदाज ; जमाबंदीचा अंदाज , ठरावणी . खूण ; चिन्ह ; अंदाज ; दिग्दर्शन . या व्यवहारांत शंभर रुपये मिळतील असा आकार दिसतो . मनोविकारांचा शरीरावर होणारा परिणाम ; विकारदर्शक स्थिति , भाव . जसें - कांपणें , हंसणें , रोमांच उभे राहणें - भीतीनें , आनंदानें वगैरे ( भूमिति ) आकृति ; चित्र . ( इं . ) फिगर . ( भूमिति ) आकृतिमान ; परिमाण . ( इं . ) व्हाल्युम . पध्दत ; वागणूक ; राहणी ; चाल ; ढब ; रीत ; तर्हा . मी परब्रह्म येणें आकारें । जेथें जीवस्वरुप स्फुरे ॥ या रीतीं बहुत आकारें तिनें झाडितां । - पंच ३६ . पृथ्वींतील एकंदर वस्तुजात , विश्व . तरी ती हरीची ज्ञान कळा केवळ । हा आकार अवघा तुझा खेळ । - ह २४ . ८७ . सारा ( जमिनीचा ). किंमत . ( कर . ) आव , आविर्भाव . आकार तर एखाद्या वकिलाचा आणला आहेस . एखाद्या वस्तूचा अमुक एक आकार हें दाखविण्यासाठीं हा शब्द योजून सामासिक शब्द बनवितात उ० मंडलाकार ; चक्राकार ; गोलाकार , वर्तुलाकार इ० [ सं . आ + कृ ] - रात जाणें - ( नाग . ) व्यर्थ जाणें ; असफल होणें . एवढी उठाठेव करुनही अखेरीस ती गोष्ट आकारांतच गेली कीं नाहीं ? ०दाखविणें मिष करणें ; आव आणणें ; ढोंग करणें ; बहाणा करणें . एखाद्या गोष्टीचें स्वरुप , मान दाखविणें - व्यक्त करणें . - रास येणें - एखादी गोष्ट , धंदा , दुखणें , काम कांहीं विवक्षित स्वरुपास येणें , रंगास येणें , मूर्त स्वरुपांत येणें ; दृग्गोचर होणें . कर्म आलें हो आकारा - विष्णूची भूपाळी २५ . फळास येणें . त्यांची अवस्था तीच तुमची पुढें येईल आकारास - ऐपो . ३०६ . कमी प्रमाणावर - संख्येवर येणें ; खालावणें . ०गोपन न. खर्या स्वरुपाची , आकृतिची , मनोविकाराची छपवणी ; लपविणें ; गुप्त ठेवणें ; पडदा पाडणें . ढोंग ; छद्मीपणा ; छद्मी व्यवहार . ०जमा स्त्री. अंदाजानें ठरविलेला वसूल ; वसुलीजमेच्या उलट . ०जात न. वस्तुजात ; उत्पन्न झालेल्या सर्व वस्तू ; विश्व . जे आकारजाताचें दुस । घडी केलें । - ज्ञा १५ . ८३ . बंद पु . लिहिलेला , तयार झालेला मसुदा ( वसूल , जमीन , पट्ट्या , वराती इ० चा ). जमाबंदीचें सरकारी वार्षिक अंदाजपत्रक ( सारा , जमीन पट्ट्य़ा , सूट , इनामें वगैरेचें ). सामान्य अंदाज पत्रक - खर्डा . [ आकार + बंद ] ०मान न. विस्तारमान ; बाह्य स्वरुपावरुन केलेला अंदाज . आकृतिमान ; परिमाण . ( इं . ) व्हॉल्युम . ( प्र . ) आकारमहत्त्व ०शुध्द वि. नीटनेटक्या , व्यवस्थित , पाहिजे तशा आकृतीचें , प्रमाणबध्द ( भांडें , घर , माणूस ). [ सं . ] ०शुध्दि स्त्री. आकृतीचा , स्वरुपाचा , बांधेसूदपणा ; अंगसौष्ठव ; प्रमाणबध्दता [ सं . ] म्ह० आकारे रंगती चेष्ट आकारैरिंगितेर्गत्या चेष्टया भाषणेनच । नेत्र वक्त्रविकाराभ्यां लक्ष्यतेऽन्तर्गतं मन : ॥ ( आकार , इंगित , चालचलणूक , कृति , भाषण , डोळे ; मुद्रा , इत्यादि गोष्टींवरुन मनुष्याच्या मनांत साधारणपणें काय चाललें आहे तें कळतें . ) या श्लोकाचा आरंभीं दिलेला पहिला चरण अपभ्रष्ट होऊन मराठींत आला आहे . मनुष्याच्या बाह्यस्वरुपावरुन त्याच्या हातून घडणार्या कृतीचें स्वरुप ताडतां येतें ; जसें - आकारेंचि परेंगित कळलें बोलोनि काय हो कळतें । - मोवन १ . १२ .
|