-
m A distinguishing mark. A partcular thing. An exception. Frankincense.
-
पु. धूप ; एका वृक्षाचा रस , चीक .
-
पु. १ असामान्य गुण , धर्म , लक्षण , चिन्ह ; वैशिष्टय ; वैलक्षण्य ; एकदेशीयता ; असाधारणपणा ; निराळेपणा ; श्रेष्ठता . २ विशिष्ट गोष्ट , व्यक्ति ; विशिष्ट गुणधर्मानें युक्त पदार्थ . ३ अपवाद . ४ ( गणित ) अंतर ; फरक ; विवक्षित प्रमाणापेक्षां अधिक . तया आणि खपुष्पा । विशेषु काई । - अमृ ७ . ५३ . - वि . असामान्य ; असाधारण ; सुप्रसिध्द ; एकाकी ; बराच मोठा ; अधिक ; वरचढ . - क्रिवि . ( विशेषेंकरून ) मुद्दाम ; मुद्दामहून ; प्रामुख्यानें ; फारकरून ; बहुतकरून ; आधिक्येंकरून . [ सं . वि + शिष् ] विशेषगुण - पु . पंचमहाभूतांचे शब्द , स्पर्श , रूप , रस , गंध हे पांच गुण . विशेषण - न . ( व्या . ) १ गुण अथवा संख्या दाखविणारा शब्द ; नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द . २ कर्त्याविषयीं विशिष्ट विधान करणारा शब्द ; विधेय . [ सं . वि + शिष् ] विशेषणें - अक्रि . विशेष वर्णन करणें . अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । - ज्ञा ३ . ७५ . हें कांई विशेषावें । - दाव २७८ . विशेषतः - क्रिवि . मुख्यत्वेंकरून ; प्रायः ; मुद्दाम ; बळेंहून . विशेषनाम - न . ( व्या . ) वस्तूंच अथवा स्थानाचें नांव ; ज्या नामानें विशेष वस्तूचा , प्राण्याचा अथवा समूहाचा बोध होतो तें नाम . विशेषलिंग - न . विशेषविभूति ; महत्त्वाच्या , प्रमुख विभूति . तेवीं माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती । - ज्ञा १० . ३०१ . विशेषज्ञान - न . ब्रह्मज्ञान ; जीवाचें , चैतन्याचें ज्ञान . विशेषात्कार - पु . असामान्यत्व ; असाधारणता ; चमत्कृति ; वैशिष्टय ; निराळेपणा . - क्रिवि . ( विशेषात्कारेंकरून , विशेषेकरून ) मुख्यत्वेंकरून ; मुद्दामहून ; विशेषत्वानें , वैशिष्ठयानें ; प्रायशः ; बहुतकरून ; फारकरून ; मुख्त्वेंकरून ; हें विशेषेंहि न घडेल । याचि लागीं । - ज्ञा ६ . ४१७ .
-
विशेष n. दमन नामक शिवावतार का एक शिष्य।
Site Search
Input language: