|
स्त्री. ( इनामदारास ) वतनास कायम जोडून दिलेलें गांव ; इजाफत इनाम ; इतर राजांकडून किंवा परराष्ट्रांकडून येणार्या जाणार्या देणग्या किंवा नजराणे यांचा हिशेब ठेवणारें खातें ; इजाफतखाना ; हा जो खर्च होतो त्यास इजाफत खर्च म्हणतात . याच्या उलट मुजाफत व मुजाफतखर्च . - स्त्रीन . आधिक्य ; वाढ ; बढती . - वि . अधिक ; जादा ; जास्त . [ अर . इझाफा = वाढ , आधिक्य ] ०गांव इजाफत अर्थ १ पहा . ०जमा स्त्री. कर्ज , नजराण्यांची विक्री वगैरे निरनिराळ्या नवीन साधनांनीं सरकारनें गोळा केलेला पैसा ; तह , तौफेर , नाणेंचढाव , वरपाडा , पारखाव , वाजगस्त , वटाव , भेटी , यादगार , उलफा , तफावत , सौकत , नालबंद , वैतें , नदीकिनाराउत्पन्न ( टरबुजें वगैरे ), तळ्याच्या कांठचें उत्पन्न , महालोमहालचें उत्पन्न , हुजुरुन आलेली रक्कम , बैलकटी , सनदसूद , गुजारत , मूस , कवडी , कचकलबाजी , गुराची नियोजी वगैरे बावी यांत येतात . - भाअ १८३४ . ४४ . एका सुभ्यांत किंवा महालांत दुसर्या महालाचा जमा झालेला वसूल . मुजाफत खर्च पहा . जव्हेरखान्यांतून एखाद्या कारखान्याकडे जिनसा दिल्या गेल्या म्हणजे त्या कारखान्यांत जव्हेरखान्याच्या नांवानें इ० होऊन खर्च कारखान्यांत दाखल होई . - जनि ( बडोदें ) ४ . जप्त केलेल्या एखाद्या गांवचा वसूल .
|