|
न. पु . अव . असामी . विशेषनाम ; नांव . मनुष्य ; अदमी ; असामी . - न . ( हिशेबांत ) नग ; सदर ; नगाचें वर्णन ; खात्याचें नांव ; वर्गाचें नांव ; बाब ; जात . माळी इसम हजीर झाले . कुंभार इसमाकडे बाकी राहिली - स्त्री . इशीम पहा . [ अर . इस्म = नांव ] ०नविशी स्त्री. नांवनिशी ; नामावली . इसमनविशीची फर्द लिहून नबाबांस अर्ज केली - रा ५ . १२७ . [ फा . इस्मनवीसी ] ०मजकूर वि. ( सरकारी कागदपत्रांतून ) वर , मागें उल्लेखिलेला ; उपरिनिर्दिष्ट ( मनुष्य ). [ फा . ] ०मुबादला पु. ( हजीरीपत्रकांत वगैरे ) बदलून घातलेलें नांव ; बदली नांव . बदली माणूस ; दुसर्याबद्दल काम करणारा इसम . [ अर . ] ०वार क्रिवि . नांवाच्या अनुक्रमानें ; नांवापुढें नांव असें ; नांवनिशीवार . हिशेबाच्या सविस्तर बाबीप्रमाणें [ अर . इस्म ; + फा . वार ] ०वारकमजास्ती स्त्री. पगार नोंदीसह नांवाचा तक्ता ; सामाशब्द - इसमवार - अर्जी , नांवनिशी , पट्टा , पत्रक , पाहणी , पावती , फाजील , वसुलीबाकी , सूट , हाजरी , रुजवात इ . ०वारी स्त्री. नांवांचा तक्ता ; नांवांची यादी , हजिरीपत्रक . ( इं . ) मस्टर , मस्टर रोल .
|