|
काळ्या जमीनीचा एक प्रकार ; हिच्यांत भूसमुशीत पणा नसून ही फार चिकट असते . हिच्यांतुन पाणी झिरपून जात नाहीं . पाणी पडलें असतां हिच्यावर मिठासारखा पांढरा क्षार येतो . हिचे काळा करळ व पांढरा करळ असे दोन प्रकार आहेत . ( का . करल = खारटपणा ; क्षारता .) वि. ( व .) महाग ; कडक ; वाजवीपेक्षां जास्त ( किंमत ).' बाजारांत उशिरां गेल्यानें गहुं जरा करळ पडले .' न. कुंभाराच्या भट्टींत कौलें . विटा वगैरेच्या खाली घातलेलें , अर्धवट जळलेलें गवत . २ अशा गवतांची एक काडी . पु. ( सोनारी ) फुलांचा ठसा . (?) स्त्री. छिद्र , ( विरळ विणलेल्या रोवळी , सूप पाटी यांच्या मधील ) फट ; चीर . ( सं . करल = वेळू ; किंवा कराल = रुंद , उघडें ) स्त्री. ( राजा .) तांदूळ व इतर धान्याचें तूस , भुसा , टरफल . करल पहा . वि. ( व .) उतरतें ; करतें . ' झोपडीचें छप्पर जास्त करळ असल्यानें पाणी थांबलें नाही .' पु. वाळुमिश्र , ठिसुळ दगड ; बरड , कड . ( सं . करक ) ०लागणें -( वांई ) पाभरीच्या फणानें जमीन जास्त खोल उकरली जाणे . ०जाणें होणें - क्रि . एका अंगाला कलणें , जाणें ( जूं , धुरी , नांगर , गाडा , तराजु , तराजुची दांडी यासंबंधी योजतात ). हा शब्द शेतकरी , लोकांत विशेष रूढ आहे . ०धरणें क्रि . ( नांगर ) आडवा धरणें . ०चालणें आडवें जाणें , आडवें निघणें . यांच्या विरुद्ध शेव ( उभें ) जाणें , चालणें .
|