|
पु. आटवलेला उंसाचा रस ; पदार्थाला गोडपणा येण्यासाठीं रस आटवून केलेला घन पदार्थ ; साखरेचा कच्चा प्रकार , अवस्था ; तांबडी साखर . [ सं . गुड ; प्रा . गुल ; पाली गुळ ; कों . गोड ; खा . गूय ] ( वाप्र . ) ०करणें उपहास , निंदा करणें . ०देणें हातीं देणें - १ लालूच दाखविणें ; लांच देणें . २ फसविणें ; भुरळ घालणें ; झुलविणें ; तोंडावर हात फिरविणें . ०पुर्या - हौस पुरविणें . गुळमटणें - १ ( राजा . ) अंबा ; चिंच इत्यादींनीं गुळमट , गोडसर होणें . २ गुटमळणें ; संदिग्ध , अडखळत बोलणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ जो गुळानें मरतो त्याला विष कशाला ? सामाशब्द - वाटणें - हौस पुरविणें . गुळमटणें - १ ( राजा . ) अंबा ; चिंच इत्यादींनीं गुळमट , गोडसर होणें . २ गुटमळणें ; संदिग्ध , अडखळत बोलणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ जो गुळानें मरतो त्याला विष कशाला ? सामाशब्द - ०आंबा गुळंबा ळांबा गुळांब - पु . एक पक्वान्न . गुळाच्या पाकांत शिजविलेल्या आंब्याच्या फोडी ; गुळाचा मोरंबा . ०कैरी स्त्री. ( व . ) गूळ घालून केलेलें बिन मोहरीचें आंब्याचें लोणचें . ०खोबरें न. ( गूळ आणि खोबरें यांचा खाऊ ). १ ( ल . ) निवळ फसवणूक ; लांच ; लालूच . गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक बळावा । - मो उद्योग ७ . ९ . २ पोकळ भाषण , वचन . ०चट चीट मट - वि . १ थोडेंसें गोड ; गोडसर . येक्या सगें तें कडवट । येक्या सगें तें गुळचट । - दा ११ . ७ . १६ . २ ( तंजा . ) गोड ; मधुर . ०चट चीट - गूळसाखर वगैरे गोड पदार्थ . गुळण्णा - पु . ( गो . ) गुळाचा गणपति . [ गूळ + अण्णा ] गुळत्र गुळय - न . गूळ , राब , काकवी यांचा समुदाय . मद पारा गुळत्र । - दा १५ . ४ . १५ . गूळदगड धोंडा - पु . १ गुळाच्या ढेपेंत सांपडणारा दगढ . गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड । - दा ८ . ५ . ४७ . २ ( ल . ) ढोंगी , कपटी मनुष्य . ०धवा धा धिवा धुवा देवा धेवा धावी - पु . केवळ तांबडा नव्हे , केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग ; गुळी रंग . - वि . अशा रंगाचा ( मोती , इ० पदार्थ ). ०धानी वि. लालसर ; गुळधवा रंगाचा ( मोती ). ०पापडी स्त्री. १ एक पक्वान्न ; गुळांत पाकविलेल्या रव्याच्या वडया . २ ( राजा . ) गुळाच्या पाकांत भाजलेली कणीक वगैरे घालून केलेले लाडू . ३ ( ल . ) एखाद्यानें मागें अपराध करून समक्ष गोड गोड , कपटी भाषण करणें ; गुळगुळ थापडी ; गुळमटा ; गुळवणी ०पीठ न. एकमेकांचा दाट स्नेह ; मेतकूट ; एकी ; सलोखा ; एक विचार . ०पोळी स्त्री. गूळ घालून केलेली पोळी . गुळमट , गुळंबट - १ गुळचट अर्थ १ पहा . २ ( गो . ) आंबटसर . ०मारी स्त्री. दर उसाच्या मळयापाठीमागें २२॥ शेर गूळ घ्यावयाचा कर . ०वणी गुळेणी गुळोणी - न . १ गुळ मिश्रित पाणी . २ ( कु . व . ) गुळाच्या पाण्याचें कालवण ( पोळीशीं खाण्यासाठीं ). यांत कधीं थोडें पीठहि घालतात . [ गूळ + पाणी ] ०वरी गुळोरी - स्त्री . एक खाद्य , पक्वान्न ; गुरोळी पहा . मांडा साखरपांडा गुळवरी । - एभा २७ . २९० ; - ह १० . ३४ . गुळवा गुळावा गुळवी गुळव्या गुळया गुळरांध्या - पु . गूळ तयार करणारा . [ गुडवाहक ] ०शील शेल शेलें - न . ( व . ) तांबडा भोपळा उकडून त्यांत दूध , गूळ घालून केलेली खीर . गुळाचा गणपती गणेश - पुवि . १ आळशी ; मंद ; गलेलठ्ठ ; अचळोजी . २ होयबा ; बुळा ; दुर्बळ ; शेणाचा पोहो . म्ह० गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य = वस्तुत : एकच असणार्या दोन व्यक्ती ; ज्याचें त्यासच देणें . गुळार गुळहार - गुर्हाळ पहा . गुळेरस - पु . ( हेट . ) नारळाचें दूध व गूळ घालून केलेलें पिठाचे गोळे यांचें बनविलेलें एक पक्वान्न .
|