|
पु. ( गणित ) तुल्य तीन अंक परस्पर गुणून जें फल येतें तो ; संख्येच्या वर्गाला पुन्हां त्या संख्येनें गुणणें . य० चोहोंचा घन चौसष्ट ( ४ x ४ x ४ = ६४ ); पांचाचा एकशें पंचवीस ( ५ x ५ x ५ = १२५ ). इ पु. लोहाराचा मोठा हातोडा . घण पहा . घन सांडस नागफणी । रात हात हातवडे ऐरणी । - कथा ३ . १७ . ९४ . [ सं . ] पु. ( भूमिति ) सहा ( सम ) चौरसांनीं मर्यादित अशी घनाकृति . - वि . लांबी , रुंदी व जाडी यांनीं मर्यादित अशी ( पोकळी , आकृति , पदार्थ इ० ). [ सं . ] पु. मेघ ; ढग . वर्षावेयां गाजे आनंदाचा घनु । - शिशु ६६ . चातकालागीं जेवीं घन । - एभा ६ . ४१२ . [ सं . ] सामाशब्द - वि. घण . १ जाड ; जाडेंभरडें ; घट्ट विणीचें ( कापड ). २ दाट ; फार पातळ नसलेलें ( ताक इ० ). ३ दाट ; गर्द ; निबिड ( छाया , झाडी , पालवी इ० ). ४ दुर्भेद्य ( अंधार ). ५ जाड ; बळकट ( फळी ). ६ घुमेपणानें स्तब्ध असलेला ( मनुष्य ). ७ गाढ ; स्वस्थ ( झोंप इ० ). ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय । - ज्ञा १४ . ७४ . ८ मोठा ; जोराचा ; मोठया सरीचा ( पाऊस इ० ). इंदिराकळत्रा इंद्रें वर्षतां घन घन धारा । - र ६२ . ९ घट्ट ; अप्रवाही ; द्रव , वायुरूप पदार्थाविरहित . [ सं . ] सामाशब्द - न. १ तास ; पितळेचें , काशाचें वाद्य याअर्थी सर्वसाधारण शब्द ; घडयाळ . घनाचा घमंड तंत लावितो लया । - दावि १६३ . २ घंटा , करताल , टाळ , झांज , झेंगट इ० प्रमाणें एक वाद्य . घनवाद्य पहा . ०कोरा वि. घणकोरा पहा . ०चित्रदर्शक न. एखाद्या पदार्थाच्या , स्थलाच्या , इमारतीच्या छायाचित्रावरून त्या पदार्थाचें , स्थलाचें , इमारतीचें हुबेहुब भरींव चित्र दाखविणारें यंत्र ; भरींवदर्शक ; यास दोन सूक्ष्मदर्शक भिंगें असून धरण्याकरितां एक मूठ असते . भिंगांसमोर चित्र ठेवण्याकरितां चौकट असते . ( इं . ) स्टिरिअऑस्कोप . [ सं . घन = भरींव + चित्र + दर्शक = दाखविणारें + यंत्र ] ००पद मूळ - न . ( गणित ) एखाद्या संख्येच्या घनापासून काढलेली मूळ संख्या ; घनाचें मूळ . उ० चौसष्टाचें घनपद - मूळ चार होय . [ सं . घन + मूल ] ०घोर घनाघोर - वि . १ निबिड ; दाट ; जोराचा ( पाऊस , ढग ). २ भयंकर ; निकराचें ; तुंबल ; हातघाईचें ( युध्द , लढाई ). ३ भडिमाराची ; आवेशाची ; जोराची ( शिवीगाळ ). ४ गाढ ; स्वस्थ ( झोंप . ) ५ दाट ; निबिड ; गर्द ( अधार , झाडी , रान इ० ). ६ दाट ; गजबजलेला ; खेंचाखेंचीचा ; गडगच्च ( मनुष्यांचा जमाव , पीक , फळें इ० ). [ घन + घोर = भयंकर ] ०गर्जना स्त्री. मेघांचा गडगडाट . हें ना घनगर्जना सरिसा । मयूर वोवांडे आकाशा । - ज्ञा १८ . ४८४ . [ घन + गर्जना = गडगडाट ] ०घमंडी स्त्री. घनाचा शब्द ; टाळ , करताल , घडयाळ , झांज इत्यादि वाद्यांचा तालबध्द गजर . घन . घमंडी उदंड होतसे । तंत भरे भरपूर । - दावि ४६८ . [ घन + घमंडी ] ०चर्मक वि. जाड कातडीचा ( पाणघोडा इ० ). [ सं . घन = जाड + चर्म = कातडें ] ०वाद्य न. घन , दोन भागांपैकीं एका भागानें दुसर्यावर आघात करून वाजलें जाणारें वाद्य ; चिपळया , करताल , झांज , मंजरी , तास , घंटा , टिपर्या , जलतरंग इ० वाद्यें ह्या प्रकारांत येतात . [ घन + वाद्य ] ०वर्ग पु. ( गणित ) एखाद्या संख्येच्या घनाचा वर्ग ; समान सहा अंक परस्पर गुणून आलेला गुणाकार . हा त्यांपैकीं प्रत्येक अंकाचा घनवर्ग होय ; एखाद्या संख्येचा षडघात . उ० तीन या संख्येचा घनवर्ग २७ x २७ = ७२९ होय . [ सं . घन + वर्ग = दोन समान अंकांचा गुणाकार ] यंत्र न. एखाद्या पदार्थाच्या , स्थलाच्या , इमारतीच्या छायाचित्रावरून त्या पदार्थाचें , स्थलाचें , इमारतीचें हुबेहुब भरींव चित्र दाखविणारें यंत्र ; भरींवदर्शक ; यास दोन सूक्ष्मदर्शक भिंगें असून धरण्याकरितां एक मूठ असते . भिंगांसमोर चित्र ठेवण्याकरितां चौकट असते . ( इं . ) स्टिरिअऑस्कोप . [ सं . घन = भरींव + चित्र + दर्शक = दाखविणारें + यंत्र ] ०गार स्त्री. गारांचा पाऊस पाडण्यासाठीं केलेलें चेटुक . पांढरकवडयावर रचविल्या घनगारा अदभुत । - ऐपो ४०१ . [ घन = ढग + गार = पावसाचें गोठलेलें पाणी ] ०वर्धनीय वि. ( पदार्थ . ) प्रसरणशील ; घनानें ठोकल्यानें किंवा दाब घातल्यानें न मोडतां पसरणारें . ( इं . ) मॅलिएबल . [ घन = हातोडा + वर्धनीय = वाढण्याजोगा ] ०फल फळ - न . ( गणित , भूमिति ) ( पदार्थाच्या , पोकळीच्या ) लांबी , रुंदी व उंची यांचा गुणाकार करून आलेलें फल ; उ० भुज ४ , कोटि ५ , उंची ३ यांचें घनफळ ६० . कोणत्याहि पदार्थानें व्यापलेला अवकाश , पोकळी ; एखाद्या घनपरिमणानें मोजिला असतां जी त्या घनपरिमाणांची संख्या उत्पन्न होते तिला त्या पदार्थाचें घनफळ म्हणतात . - महमा ९२ . [ घन + फल = उत्तर , गुणाकार ] ०दाट वि. १ गडगच्च , निबिड . भरला घनदाट हरि दिसे । २ घट्ट ; पातळ नसलेला ( द्रवपदार्थ ). ३ ( ल . ) अतिशय सलगीचा ; जिवलग ; सलोख्याचा ( स्नेहभाव , मैत्री ). घणदाट पहा . ४ गजबजलेला ; खेंचाखेंचीचा ( जमाव , सभा इ० ). ऐसी सभा बैसली घनदाट । - शनि ८ . घणदाट पहा . [ घन = निबिड , किंवा ढग + दाट ] ०घटा स्त्री. मेघपटल ; मेघडंबर ; ढगांचा समुदाय . चट उठवल्या घनघटा , पडति पटपटा बिंदु कटितटासि बळकट धरा । - राला ५६ . [ घन + घटा = समुदाय ] ०वर्धनीयत्व न. ( पदार्थ . ) हातोडयानें ठोकल्यानें किंवा दाब घातल्यानें प्रसरण पावण्याचा पदार्थाचा धर्म ; पदार्थ विज्ञानशास्त्रांत सांगितलेल्या पदार्थाच्या अंगच्या गुणापैकीं एक . ( इं . ) मॅलिअॅबिलिटी . [ घनवर्धनीय ] ०फूट पु. पदार्थाचें अवकाशाचें आकारमान , घनफळ , फुटांनीं मोजण्याचें इंग्रजी पध्दतीचें परिमाण . उ० दोन फूट लांब , दीड फूट उंच व एक फूट रुंद अशा पदार्थाचें घनफळ तीन घनफूट भरेंल . [ सं . घन + इं . फूट ] घनाकृति - स्त्री . एक किंवा अनेक पातळयांनीं सर्वोगाकडून मर्यादित अशी आकृति , अवकाश . - महमा ५ . घन . ( इं . ) सॉलिडफिगर . [ घन = लांबी , रुंदी व उंची असलेली + आकृति ] घनांग - न . भूमितिविषयक एक परिमाण . [ घन + अंग ] ०दाटणें गर्दी होणें ; खेंचाखेंच होणें . सभा घनदाटली विमानीं । - देवीचीभूपाळी ३० . [ घनदाट ] ०चकर चक्कर चक्र - नपुस्त्री . १ मेघ ; ढग ; फिरणार्या ढगांचा समुदाय ; ढगांचें चक्र . २ निबिड , दाट असें मेघमंडळ , मेघपटल ; मेघजाल ; ढगांची गर्दी ; ( माळवी ) वावटळ ; चक्रवात . ३ तुंबळ व निकराचें युध्द ; हातघाईची लढाई ; रणकंदन ; कडाक्याचें भांडण . गजावरी गज लोटले । रथाशीं रथ झगटले । एकची घनचक्र मांडिलें । रामकृष्ण पहाती । - ह२२ . ९५ . अकस्मात बोलतां बोलतां त्याचें आणि याचें घनचक्र उडालें . ४ थाटमाट ; भव्य देखावा ; मोठा पसारा ; अवडंबर ; जलसा ; मजा ( गाणें , नाच , तमाशा , खेळ इ० चा ). ५ ( जेवणाची , पोळयांची , तुपाची ) चंगळ ; विपुलता ; चमचमाट . ( वरील ४ व ५ अर्थी प्रयोग करतांना जेवणाची , गाण्याची घनचक्कर अशी शब्दरचना आवश्यक आहे ). ( क्रि० उडणें ; उडविणें ). - वि . क्रिवि . घनघोर पहा . १ मेघांच्या मंडलांनीं युक्त ( आकाश इ० ). जोराचा , मोठया सरींचा ( पाऊस ). २ निकराची ; हातघाईची ; तुंबळ ( लढाई , युध्द , भांडण ). ३ निबिड ; दाट ; गर्द ( अरण्य , पालवी , अंधार , छाया ). ४ विपुल ; भरगच्च , दाट ( पीक ), रेलचेलीचें , चंगळाईचें ( जेवण , खाद्य पदार्थ ). ५ गाढ ; स्वस्थ ( झोंप ). ६ मोठया प्रमाणावर चाललेला ; जोराचा ( धंदा , व्यापार इ० ). [ सं . घन = मेघ , ढग + चक्र = चाक , समुदाय ] ०दाटी स्त्री. १ जीवश्चकंठश्च स्नेह , मैत्री ; जिवलग सख्य . २ अतिशय दाटी . घणदाटी पहा . [ घनदाट ] प्रसरण - न . ( पदार्थ . ) घन पदार्थाचें उष्णतेनें प्रसरणें पावणें ; आकारमानांत वाढ . ( इं . ) एक्स्पॅन्शन . [ घन + प्रसरण = पसरणें ] ०चरक १ एकदम सर्वबाजूंनीं गर्दी उडणें हलकल्लोळ उडणें . २ खूप रंग येणें . उडणें १ एकदम सर्वबाजूंनीं गर्दी उडणें हलकल्लोळ उडणें . २ खूप रंग येणें . ०रूप न. घनाकाराचा , लांबी , रुंदी व उंची असलेला पदार्थ ; घट्ट , द्रवरूप नसलेला पदार्थ . [ घन + रूप + द्रव्य = पदार्थ ] द्रव्य न. घनाकाराचा , लांबी , रुंदी व उंची असलेला पदार्थ ; घट्ट , द्रवरूप नसलेला पदार्थ . [ घन + रूप + द्रव्य = पदार्थ ] ०नील नीळ - वि . मेघश्याम ; ढगाप्रमाणें निळसर रंगाचा . [ घन + नील ] - पु . कृष्ण , राम . निजभावें पाहे गोरटी । तंव घनश्याम देखे दृष्टीं । - एरुस्व ७ . ६२ . ०श्याम वि. मेघाप्रमाणें कृष्णवर्ण ; काळासांवळा . घनश्याम हा राम लावण्यरूपी । - राम ६७ . [ घन + श्याम = सांवळा , काळा ] ०वट वि. १ मजबूत ; जाड ; घट्ट विणीचें ( कापड इ० ). २ ( काव्य . ) सर्वव्यापक ; श्रेष्ठ ; सर्वव्यापी ; सर्वीचा सारभूत . ३ ( काव्य . ) जड ; भारी ; वजनदार . मेरूपासाव घनवटें । जीं हिंसीं जालीं तुकमठें । - ऋ ३० . ४ ( काव्य . ) भरींव ; भरदार ; कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । - ज्ञा २ . १३० . - अमृ २ . २१ . - एभा ११ . १७ . - दा ६ . १० . २२ . ५ घट्ट ; कठिण . गुरु तो वस्तु घनवट । लघुत्वें बोली हळुवट । - विड ११ . २८ . कां मी येतुली घनवट ऐसे । पृथ्वीचि जाणे । - ज्ञा १० . १७६ . [ घन = दाट + वृत्त किंवा वत ] ०वटता स्त्री. भारीपणा ; जडपणा ; घट्टपणा . [ घनवट ] ०सांवळा वि. घनश्याम ; मेघासारखा ; सांवळया रंगाचा ( कृष्ण , राम ). पाहावया घनसांवळा । कृष्ण श्यामता आली बुबुळां । - एरुस्व ७ . २३ . घनावळी - स्त्री . मेघपंक्ति ; मेघमंडळ ; मेघमाला ; ढगांचा समुदाय . अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवीं । - ज्ञा ९ . ११९ . [ घन = मेघ + आवली = पंक्ति , समुदाय ] घनाश्रय - पु . वातावरण ; अंतराळ . [ घन = मेघ + आश्रय = आश्रयाचें ठिकाण ] ०वटपण न. घट्टपणा ; भरींवपणा ; भरदारपणा ; घनता . शब्दफोल अर्थ असे । घनवटपणें । - दा ६ . १० . २० . कीं अवधान आणि श्रवण । कीं पृथ्वी आणि घनवटपण । - भवि ४५ . १२९ . [ घनवट ] ०वाड वि. निबिड ; दाट ; गर्द . - शर . [ घनवट ] ०विरोध पु. ( पदार्थ . ) पदार्थाच्या आकारमानामुळें उत्पन्न होणारी प्रतिबंधक शक्ति . ( इं . ) व्हॉल्युमरेझिस्टिव्हिटि . [ सं . घन + विरोध = प्रतिबंद ] घनाकार - पु . भरींव आकार ; गोळयाचा आकार ; लगड . पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती । - ज्ञा ८ . १७३ . [ घन = भरींव , घट्ट + आकार = रूप ] ०सर वि. दाट ; विपुल ; ऐवजदार ; भरदार . पिकें होतां धान्यें घनसर बरीं स्वस्त विकतीं । - दावि २२५ . घणसर पहा . [ घन + सर प्रत्यय ] घनांधकार - पु . ( काव्य . ) दाट काळोख ; घोर अंधार . घनांधकारांत दिवा जसा वनीं । - मृच्छकटिक . [ घन = दाट + अंधकार = अंधार ] घनाज्ञान - न . गाढ , घोर अज्ञान . [ सं . घन = गाढ + अज्ञान ] घनीकरण - न . ( पदार्थ . ) पातळ , वायुरूप पदार्थ घट्ट करणें . ( इं . ) कन्डेन्सेशन . [ सं . ] घनीभवन - न . ( पदार्थ . ) पातळ , वायुरूप पदार्थ दाट , घट्ट होणें . उ० पाण्याचें बर्फ बनणें , पातळ मेण थिजून घट्ट होणें . ( इं . ) सॉलिडिफिकेशन . - भूव २६ . [ सं . ] घनीभूत - वि . गोळयाच्या , लगडीच्या रूपानें असलेलें ; घट्ट झालेलें ; आकार धारण करणारें . नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण । - ज्ञा १ . ४४ . [ सं . ]
|