|
स्त्री. चिमणी , उंदीर वगैरे प्राण्यांचा आवाज . २ रागावलेल्या लोकांचा , तगादा करणार्यांचा , भिकार्यांचा , शाळेंतील मुलांचा कलकलाट . तुम्हीं सगळे मला चिवचिव तोडूं नका , एक जण सांगा . बाजारांत त्याची चिवचिव झाली . = बाजारांत लोक त्याच्या भोंवतीं जमून निंदेचा , तगाद्याचा , निर्भर्त्सनेचा कलकलाट करूं लागले . ३ चीत झालेल्या पहिलवानाचें , मुष्टियोध्दयाचें पुटपुटणें , चडफडणॆं , कबुली देणें . ४ असंतुष्टपणानें स्वत : च्या मनाची कशीबशी समजूत घालून घेणें ; अक्षमतेची , दुबळेपणाची पिरपिर . [ सं . चीव = बोलणें द्वि ; चीव - भाषार्थे - राजवाडे ग्रंथमाला ]
|