|
स्त्री. १ घोडयाच्या आयाळाच्या केंसांच्या वळलेल्या वेणीस जोडलेली साटणीची , फितीची चिरमी , धांदोटी , चिंधी , पट्टी . २ उंसाच्या गंडेरीचा , जोंधळयाच्या ताटाचा चावून राहिलेला चोथा . [ सं . चिपिट = सपाट ] स्त्री. १ पत्रावळीचीं पानें जोडण्यासाठीं ( पत्रावळी लावण्यासाठीं ) केलेली बोरूची , बांबूची बारीक काडी , चोय , चोई , चोयटी . २ फणीचा , कंगव्याचा दांत घ्हावयाजोगी , दांत म्हणून असलेली बांबूची बारीक सळई . ३ डफावरील बोल काढण्यासाठीं वापरावयाची लवचीक वेताची काडी . [ सं . सूचि - ची = बारीक सळई , सुई ]
|