Dictionaries | References

चौर्‍यायशी

   
Script: Devanagari
See also:  चौर्‍याशी

चौर्‍यायशी

 वि.  १८४ संख्या ; ऐशी आणि चार . २ ( ल . ) चौर्‍याशी लक्ष योनी ; जीवास प्राप्त होणारे अनेक जन्म . उत्तम तनु जाइल मग फेरे चौर्‍याशीं फिरसी । - देप ६८ . अघसंचित दोषानें फिरलों चौर्‍याशीं । - दत्तपदें पृ . ९३ . [ सं . चतुरशीति ; प्रा . चउरासी , हिं . चौरासी ] ( वाप्र . )
०आसनें   नअव . हटयोगांतील ( योग्याच्या ) बैठकीच्या निरनिराळया चौर्‍याशी तुर्‍हा , शरीररचना ; उदा० शीर्षासन , पदमासन , मयूरासन , बकासन , सर्वांगासन इ
०म्ह०   ( ग्राम्य ) एका टिरीवर चौर्‍याशी आसनें . = एकच मनुष्याला अनेकांचीं अनेक कामें पहावीं लागणें . - चाफेरा , गरका - पु . १ चौर्‍यायशी लक्ष योनींतून भ्रमण ; पुन्हां जन्म , पुन्हां मरण असें ८४ लक्ष वेळां होणें ; जीवाला चौर्‍यायशीलक्ष निरनिराळया देहांतून , रूपांतून भ्रमण केल्यानंतर मोक्ष मिळतो अशी हिंदूंची समजूत आहे . तेणें चुकें जन्मजरा । चुकवी चौर्‍याशीचा फेरा । - एकनाथ . तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चौर्‍याशीचा फेरा फिरों नको । - तुगा ३०१८ . २ ( ल . ) पुनर्जन्म ; संसारयातना . पुन : चौर्‍यायशीच्या फेर्‍यांत पडलांत म्हणून समजा . - नामना ४१ . ३ ( ल . ) अत्यंत गुंतागुंतीची स्थिति ; न उकलतां येणारा घोंटाळयाचा प्रसंग .
०जन्मयातना  स्त्री. चौर्‍यायशी लक्ष योनींतून जन्ममरणांच्या भ्रमणाचें दु : ख . न चुकती जन्म चार्‍यांयशी यातना । - निगा ३२४ .
०लक्षयोनि   लक्षजीवयोनि - स्त्रीअव . जीवाला एका मागून एक घ्यावयाचे निरनिराळें चौर्‍यायशी लक्ष जन्म , चौर्‍याशीलक्ष योनींतून फिरल्यानंतर जीवाला मोक्ष प्राप्ति होते अशी हिंदची समजूत आहे . जारज , अंडज , स्वेदज व उदभिज या चार खाणींतून प्रत्येकीं निरनिराळया एकजीसलक्ष योनी मिळून चौर्‍याशी लक्ष योनी होतात . किंवा २० लक्ष वृक्षादि स्थावर योनी , ११ लक्ष कीटकयोनी , ९ लक्ष जलचर योनी , पक्ष्यांच्या १० लक्ष योनी , ३० लक्ष पशुयोनी व ४ लक्ष मनुष्ययोनी मिळून ८४ लक्ष योनी होतात . प्राप्त चौर्‍याशीलक्ष योनी । - देप ३६ . चौर्‍याशीलक्ष जीव योनी । शास्त्रीं अवधें नेमुनी । बोलिलें असे । - दा २० . ६ . ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP