|
नस्त्री . ( कों . ) १ जीर्ण व खराटलेलें , वठलेलें झाड , वनस्पति . २ असल्या झाडाचें खोड , बुंधा , सोट . ३ असल्या वृक्षाची एखाददुसरी उरलेली फांदी . ४ ( ल . ) जर्जर झालेला , खंगलेला खप्पड , म्हातारा मनुष्य . ५ ( ल . ) ( साथ इ० कांत कुटुंबांतील बाकीचीं माणसें मेल्यामुळें ) शिल्लक राहिलेला एकटाच पुरुष , वंशांकुर . ६ ( ल . ) अतिशय खंगलेला , गरीब , मरतुकडा माणूस , दुष्काळी माणूस . हें मूल वाळून झीट झालें . [ झड ; सं . क्षीण ; प्रा . झीण ]
|