Dictionaries | References

झीण

   
Script: Devanagari
See also:  झांट , झाट , झींट , झीट , झीड

झीण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  An old, bare, and decaying tree or plant: also a stump, stub, or remaining stock. An old and decrepit man. A shrunken and meagre person, a starveling.

झीण     

नस्त्री . ( कों . ) १ जीर्ण व खराटलेलें , वठलेलें झाड , वनस्पति . २ असल्या झाडाचें खोड , बुंधा , सोट . ३ असल्या वृक्षाची एखाददुसरी उरलेली फांदी . ४ ( ल . ) जर्जर झालेला , खंगलेला खप्पड , म्हातारा मनुष्य . ५ ( ल . ) ( साथ इ० कांत कुटुंबांतील बाकीचीं माणसें मेल्यामुळें ) शिल्लक राहिलेला एकटाच पुरुष , वंशांकुर . ६ ( ल . ) अतिशय खंगलेला , गरीब , मरतुकडा माणूस , दुष्काळी माणूस . हें मूल वाळून झीट झालें . [ झड ; सं . क्षीण ; प्रा . झीण ]
 स्त्री. ( चंदनाचें खोड , गंधाचा रवा , हळकुंड इ० कांचें उगाळून उगाळून शिल्लक राहिलेलें ) बोटूक ; खोड ; ( एखाद्या पदार्थाचा ) घासून घासून अवशिष्ट राहिलेला भाग . [ सं . क्षीण ; प्रा . झीण ; हिं . झीन ; गु . झिणुं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP