|
न. १ मातीचे ढेकूळ ; डिखूळ . २ जिराईत पिकाची जमीन . त्या गांवांत २५ बिघे ढेप आहे . ३ जमिनीची पिकावरुन , उत्पन्नावरुन मोजणी ( विस्तारावरुन ); मुडा , खंडी , कुडव , अधोली असे या जमिनीच्या मापाचे भाग केलेले असतात . - स्त्री . १ उसाचा रस कढवून विशिष्ट आकाराच्या तयार केलेल्या खळग्यांत ओतल्यावर थंड होऊन त्याचा बनणारा गोळा ; गुळाचा मोठा खडा ; भेली . २ पेंड , भात , धान्य , दही , जटाभार , कागद , पाने , गवत इ० चा गोळा , गट्ठा , जुडा , खाप . ढेंप लावित असे टुकयाते । - क्रिंगवि २२ . ३ ( गुरे , पाऊस आणि विस्तव ह्यापासून संरक्षण व्हावे म्हणून ) वर मातीची डिखळे घालून लिंपून ठेवलेली कडब्याच्या पेंढ्यांची गंज ; ढेपण . [ वैसं . द्रप्स = बिंदु ; हिं . ढेपा ] ढेंपेचा गुरु - न . १ ( शब्दशः ) पेंडीवर पोसलेली गाय , बैल . २ ( ल . ) लांचखाऊ माणूस .
|