Dictionaries | References

तकराद

   
Script: Devanagari
See also:  तकरार , तक्रार , तक्रारखोर

तकराद     

 स्त्री. १ ( कायदा . ) वादी - प्रतिवादी - फिर्यादी - आरोपी - भांडणारे दोन पक्ष इ० कानी स्वपक्षसमर्थनार्थ केलेले भाषण , लिखाण ; ( इं . ) आर्ग्युमेंट . ( क्रि० करणे ; घेणे ). २ हरकत ; अडथळा करणे ; अडचण ; आक्षेप घेणे ; कुरकुर . ( क्रि० करणे सांगणे ). ३ वादविवाद ; भांडण ; झगडा . ४ आक्षेप ; फिर्याद ; गार्‍हाणे ; ओरड . ५ ( चुकीने ) दोषारोप ; आळ . तकराळ पहा . ६ पुनरुक्ति . याप्रमाणे तक्रार करुन सांगून पाठविले . - रा . ५ . २०६ . [ अर . तकरार ]
०अर्जी  स्त्री. ( कायदा . ) खालच्या कोर्टाच्या विरुद्ध वरिष्ट कोर्टाकडे केलेला अर्ज ; दाद मागणे . ( इं . ) अपील .
०खोर   तक्रारी - र्‍या - नेहमी तक्रार करणारा ; भांडणखोर ; हुज्जतखोर .
०खोरी  स्त्री. भांडखोरपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP