|
स्त्री. १ वतन , गांवचा खर्च इ०कांचा वांटा , विभाग , फाळणी , वांटणी , हिसा , भाग . २ विशिष्ट नियमांनी संघटित असलेला समाज , संघ , वर्ग , जाति , मंडळ , कंपनी . [ अर . तक्सीम ] ०दार पु. वाटेकरी ; भागीदार ( जमीन , हक्क , मालमत्ता इ० चा ). ०दारी स्त्री. १ तक्शीमदाराचा हक्क ; वाटणी ; भाग . २ तक्सीमदाराच्या हक्काने मिळावयाचा द्रव्याचा हिस्सा ; भागीदरी . [ तक्सीमदार ]
|