Dictionaries | References त तापणे Script: Devanagari Meaning Related Words तापणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. गरम होणे ;क्रि. उद्दीप्त होणे , रागावणे , संतापणे , क्षुब्ध होणे . तापणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb उष्णता मिळाली असता गरम होणे Ex. उन्हाळयात रेताड जमीन खूप तापते. HYPERNYMY:होणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmগৰম হোৱা bdगरम जा benউত্তপ্ত হওয়া gujતપવું hinतपना kanಕಾವೇರು kasتوٚت گَژُھن kokतापप malചൂട് പിടിക്കുക mniꯃꯩꯁꯥ꯭ꯐꯡꯕ nepतातो हुनु oriଗରମ ହେବା panਤੱਪਣਾ tamவெப்பமடை telవేడెక్కుట urdتپنا , گرم ہونا , تپش ہونا See : चिडणे, उत्तेजित होणे तापणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( सूर्य , अग्नि , ज्वर इ० कांच्या योगाने ) पर्वत , शरीर इ० तप्त होणे . २ ( ल . ) ( काम , क्रोध इ० विकारांनी ) क्षुब्ध , संतप्त , उद्दीपित होणे ; संतापणे ; रागावणे . ३ ( ल . ) ( दुःख , शोक इ० कानी ) तळमळणे ; व्याकूळ ; घाबरे होणे ; पोळणे ; अनुदिनि अनुतापे तापलो रामराया । - रामदास - करुणाष्टक १ . ( नवनीत पृ . १७० ). करुं वरि कृपा हरुं व्यसन दीन हा तापला । - केका ९ . ४ ( विषयवासना , तृष्णा ) चेतणे ; उद्दीपित , प्रब्ध होणे ; विकोपास जाणे . ५ ( व . ) शेकणे . [ ताप ] ( वाप्र . ) गळा तापणे - काही वेळ गायन केल्याने कंठांतून बराच मोठा स्वर निघावा अशी दशा होणे . तापल्या तव्यावर ( पोळी ) भाजून घेणे - एखाद्या कार्यात दुसरे कार्य सहजासहजी होण्यासारखे असल्यास अवश्य करुन घेणे ; वाहत्या गंगेत हात धुणे . तापल्या पाठीने - क्रिवि . अंगांत उमेद , जोम , ताकद आहे तोपर्यंत . म्ह० तापल्या पाण्याला चव नसते . मैत्रीचा एकदां भंग झाला तर ती पुन्हा पूर्ववत सुखकारक होत नाही . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP