|
वि. अर्धा ; निमा . [ फा . निमा ] ०कंठीदार वि. अर्धी कंठी ( छातीवरील निमगोल पट्टी ) असलेला ( अंगरखा ) ०की स्त्री. १ उजळणीचा एक प्रकार . एक पासून शंभरापर्यंत संख्यांच्या निमपटी पाठ करणे . २ निमके अर्थ ( २ ) पहा . ०के न. १ घोड्याच्या अथवा बैलाच्या ओझ्याचा अर्धाभाग ( मुख्यत्वे आयात - निर्गत मालावरील जकातीसंबंधी व्यवहारांत योजतात ). २ अर्ध , अथवा त्याचा कोणताहि गुणाकार . उदा० १॥ , २॥ . [ निमा ] ०खाई स्त्री. शेतकी , व्यापार , उद्योग इ० व्यवहारांत अर्धा वांटा , हिस्सा . २ शेताच्या उत्पन्नांतील अर्धा वांटा ( जमीन कौलाने देणार्याचा अथवा घेणार्याचा ). ३ अर्धेल , अर्धुक ; अर्धा . निमाई पहा . [ निमा + खाई प्रत्यय ] ०गुंडीचा वि. न लागणार्या गुंड्या , मुदनी असणारा ( अंगरख्याचा गळा ). ०गोणी निमकगोणी - स्त्री . ( जकातबाब ) अर्धी गोणी , धान्याचे पोते . ०गोरा वि. १ कांहीशा गोर्या वर्णाचा ; थोडा , अर्धवट गोरा . २ ख्रिश्चन ; युरेशियन . ब्राह्मणेतरास पहिल्याने जागा द्याव्या . त्यांतहि पहिल्याने निमगोर्यास किंवा आठ आणे युरेजिनास .... - टि ३ . २२ . ०गोल पु. अर्धगोलाकृति ; अर्धवर्तुल स्तंभाकार शरीर , आकार ; गोळ्याचा , पंचपात्राचा अर्धा भाग . - वि . अर्धे कलाबतूचे आणि अर्धे रेशीम , कापूस इ० नी बनविलेले , तयार केलेले ; अर्धे जरीचे . ०ताजीम स्त्री. ( अर्धा मान , अर्धा सत्कार ) उठून उभे न राहतां केवळ उठल्यासारखे करुन ( भेटीस आलेल्याचे ) स्वागत अथवा रवानगी करणे . ( क्रि० देणे ; घेणे ). याच्या उलट खडी अथवा पुरी ताजीम . [ निमी + ताजीम ] ०थल स्त्री. १ शेताचे अर्धे उत्पन्न ; विशेषतः अर्धा वांटा , हिस्सा ( जमीन कौलाने घेणार्याचा अथवा देणार्याचा ). २ जमीनीचे उत्पन्न वांटून घेण्याकरितां जमीनी कौलाने देणारा आणि घेणारा यांची भागीदारी ; सारखी वांटणी ; अर्धेलीची पद्धत . [ निमा + थल ] ०थाना स्त्री. कापणीनंतर पिकाचे उत्पन्न काढण्याचा प्रकार . सर्व पेंढ्या मोजून त्यांतीन तीन ( एक अगदी भरदार दाण्याची , एक मध्यम व एक अगदी फोलकट अशा ) पेंढ्यांचा साधारण उतार काढावयाचा व नंतर सर्व पेंढ्यांच्या उतार्याचा हिशेब करावयाचा . ०दस्ती वि. १ नेहमीच्या रकमेच्या निम्याने कर , खंड बसविलेली ( माल , जमीन ). २ निमेधान्य देण्याच्या ठरावाने केलेले ( शेत इ० ). [ निमा + दस्त ] ०पट स्त्री. अर्धा ; निमा ; अर्धा भाग . [ निमा + पट ] ०पितळी वि. ( कु . ) थोडी पितळ घातलेले ( पायतण ). ०शाई स्त्री. १ अर्धे करणे ( क्रि० करणे ). २ अर्धेली ; अर्धा भाग . अर्धेल पहा . ०सरकारी वि. सरकारचा कांही ताबा असलेली ( शाळा , संस्था इ० ). टिळक विद्यापीठ हे कांही सरकारी किंवा निमसरकारी विद्यापीठ नव्हे ... - केले १ . ३२ . ०सारा पु. अर्धा सारा , कर . ०स्तनी वि. अर्ध्या बाह्यांचा ( अंगरखा ); जाकीट ; कोपरी . - वाडसमा १ . ११९ . [ निमी + अस्तानी ] निमा पु . अर्धा भाग ; अर्ध . - वि . अर्धा . [ फा . नीम ] निमाई स्त्री . निमखाई पहा . निमे स्त्री . अर्ध ; एकद्वितीयांश . आयुष्य वर्ष शत त्यात निमे निजेले । - वामन , स्फुट श्लोक ६९ . ( नवनीत पृ . १४१ ). - वि . अर्धे . ( विशेषतः समासांत उपयोग ). [ फा . नीम ] निमेनिम , निमोनिम वि . अर्धाअर्धा . - क्रिवि . अर्ध्याने ; अर्धेअर्धे करुन ; अर्ध्या केलेल्या स्थितीत . निमेशिमे क्रिवि . अर्धेमुर्धे ; जवळजवळ अर्धे ; सुमारे अर्धे . [ निमे ] निम्मा , निम्माई , निम्मे , निम्मेनिम , निम्मेशिम्मे निमा , निमाई इ० पहा .
|