|
न. ( कुत्सितार्थी ) डोकें ; टकलें ; टाळकें ; डोचकें ; डोसकें ; टकुरें ; बोडकें . [ सं . बुध्न ; का . बोठ्ठ ; तेलगु . बोळी , बोडी = हजामत केलेलें डोकें ] बोड करणें - हजामत करणें . खोड मोडणें ; नरम करणें . बोडका - वि . डोक्यास कांहीं एक न घातलेला ; उघड्या डोक्याचा . डोकीवरील केंस काढलेला . डोई बोडका शिखा नष्ट । - नव . १८ . ३३ . ज्या योगानें एखाद्या पदार्थाच्या शिरोभागीं शोभा येतें तें नसलेला ; शेंड्यावर , शिखरावर , डोक्यावर कांहीं नसलेला . उदा० शेंड्यावांचून झाड ; शिंगावांचून गाय ; बोटाशिवाय हात , पाय ; डोक्यावर केंस नसलेली स्त्री ; झाडाशिवाय टेकडी ; छप्पर नसलेलें घर इ० ; त्याप्रमाणें ज्याची बायको मेली आहे असा ; विधुर . [ सं . बुध्न ; का . बोट्ट ] म्ह० हातीं धरल्यास रोडका , शेंडी धरल्यास बोडका . ०कांदा पु. पाती नसलेला कांदा . याच्या उलट पातीचा कांदा . ०देवी स्त्री. विधवा स्त्री . ०निवडुंग पु. निवडुंगाच्या अनेक जातींपैकीं एक जात . बोडकाविणें सक्रि . झाड इ० च्या फांद्या तोडून नुसता खुंट उभा ठेवणें ; झाड भुंडें करणें ; छाटणें . सर्वस्वी लुटणें ; नागविणें . हजामत करणें . बोडकी - स्त्री . केशवपन केलेली स्त्री ; विधवा स्त्री . म्ह० बोडकी आरशांत पाहे , सहदेव म्हणे कांहीं तरी आहे . बोडकूल , बोडकें - न . ( निंदार्थी ) डोचकें . बोडकी . बोडकें भात , बोडका - नपु . एक प्रकारचें भात ; कोथिंबिरें भात बोडणें - सक्रि . ( निंयेदें ) हजामत करणें ; मुंडणें ; वपन करणें . शेंडा छाटणें ; भुंडा करणें . बुचाडणें ; नागविणें ; लुटणें . खरडपट्टी काढणें ; भोसडणें ; फजीती करणें . सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनिया सोडी । - तुगा २८१९ . [ का . बोडिसु ] बोडणी - स्त्री . हजामत . लूट ; नागवण . खरडपट्टी ; ताशेरा . झाली बोडणी विटंबना । - तुगा ७३० . बोडंती - स्त्री . बोडणी . बोडभद्र - न . ( गो . ) भद्राकारण ; हजामत . बोडविसुळणी - स्त्री . बोडणी . बोडसा , सें - पुन . ( निंदार्थी ) डोचकें .
|