|
पु. बाजारांतील दर , दाम , किमत आज बाजारांत बाजरीचा भाव सहा शेर होता . पु. पु. ( कों . ) भाऊ [ भाऊ ] भावकी - स्त्री . ०भक्ति स्त्री. बाजारांतील दर , दाम इ० संबंधींची हकीगत ; बाजारगप्प . काय हो , आपण बाजारातून आलात , भावभक्ति कशी काय ! भाऊपणा ; बंधुत्व ; स्नेह . मित्रास वंचिती मग कोठुन भावकी । - ऐपो ३६९ . भक्ति ; श्रद्धा ; निष्ठा ; खात्रीची ; भावना . माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं । - ज्ञा ९ . ३५३ . असे हो जया अंतरी भाव जैसा । - राम ३५ . हेतु ; अर्थ ; मन ; अंतःकरणप्रवृत्ति ; उद्देश . न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं । - तुगा १० . समाइकांत हिस्सा , भाग . [ भाऊ ] ०भगत स्त्री. चलती , भरभराट , विपुलता इ० चा काल ( मनुष्य , कामधंदा , फळें इ० चा ) पंधरा दिवस आंब्याची भावभगत आहे . अभिप्राय ; आशय ; धोरण ; वळण ; झोंक ; गर्भितार्थ . रुप तसें विविध तिहीं कां केलें स्पष्ट सांग भावातें । - मोसभा ७ . ६६ . मनोविकार ; मनोवृत्ति ; भावना . जसें - शत्रु - बंधु - क्रोध - दुष्ट - भक्ति - मित्र - भाव . अस्तित्व ; असणें . एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी । - अमृ ७ . ७७ . जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें . प्रत्यय किंवा अनुबंध यामुळें होणार्या फेरफाराशिवाय असणारा शुद्ध धात्वर्थ ; धातूचा मूळ अर्थ . उदा० चाल इ० धातूपुढें णें हा प्रत्यय चाल धातूचा मूळ दाखवितो . भावकुंडलींतील बारा स्थानांपैकीं प्रत्येक ; स्थान . कुंडली पहा . नैसर्गिक स्थिति , धर्म , स्वभाव ; प्रकृति . जसें - सत्वभाव ; तमोभाव ; रजोभाव . म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुना आधीं । - ज्ञा ८ . ५६ . विकार , वृत्ति , राग , क्रिया , चित्तवृत्ति , हावभाव इ० चा वर्ग . ह्याचे पाच प्रकार आहेत . विभाव , अनुभाव , व्यभिचारी भाव , सात्त्विकभाव , स्वाथींभाव . पैकीं विभाव , अनुभाव व स्थायीभाव हे अनुक्रमें रसाचीं कारणें , कार्यें व पूर्वरुपें आहेत . जीवाची स्थिति , दशा , अवस्था . जसें - उत्पत्ति , स्थिति , लय इ० ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे । - वामन भरतभाव ५८ . ( शब्दाचा ) धर्म , गुण , अस्तित्व , विषय , संबंध , अधिकार , अवस्था इ० ची स्थिति ; संस्कृतांतील ता आणि त्व व प्राकृतांतील पण , पणा , की हे प्रत्यय लागून झालेला शब्दाचा अर्थ . जसें - ब्राह्मणाधिष्ठित भाव तो ब्राह्मणपणा ; उग्र - क्रूर - दृढ - सौम्य - शत्रु - बंधु - भाव . जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासहि । - ज्ञा ६ . १०२ . जन्म ; अस्तित्वात येणें ; उत्पत्ति . ( तर्क ) पदार्थ . भाव किंवा भावरुप पदार्थ सहा आहेत - द्रव्य , गुण , कर्म , सामान्य , विशेष आणि समवाय . सातवा पदार्थ अभाव . रति ; प्रेम ( काव्यांतील वर्णनाचा किंवा नाट्य प्रयोगाचा विषय ). क्षमता ; शक्ति ; सामर्थ्य ; पराक्रम ( शारीरिक किंवा मानसिक ). माया ; मिष ; कपट ; आव . ध्यान केल्याचा भाव करितो . - कमं १ . लक्षण ; प्रकार . द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती । - गुच ५३ . २० . इच्छा . हाची भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ । - तुगा ६९९ . आवड . दुर्योधनें विषान्नें वाढविली भीम जेवला भावें । - मोआदि १९ . १३ . ( नृत्य ) अभिनय पहा . [ सं . भू - भाव ] म्ह० जसा भाव तसें फळ . ०पाहणें ( ना . ) परीक्षा करणें ; अनुभव घेणें . मी सार्यांचा भाव पाहिला . या जगांत कोणी कोणाचें नाहीं . ०भाजणें दुष्ट हेतु तडीस नेणें . एकाद्यानें केलेलें दुष्ट भावित प्रत्ययास येणें . ०सोडणें ( भूतानें ) पछाडलेल्या माणसास सोडणें . मरणें ; गतप्राण होणें . नाशाच्या मार्गांत असणें . भावाचा भुकेला - भक्ति , श्रद्धा यांकरितां भुकेला . भावाचा भुकेला श्रीपति । आणिक चित्तीं नावडे त्या । सामाशब्द - कर्तरि - वि . जेथें क्रियेचा केवल भाव तोच कर्ता असतो आणि कियापद नेहमीं नपुंसकलिंगी एकवचनीं असतें असा ( प्रयोग ). उदा० मला कळमळतें . ०कर्तृक वि. ( व्या . ) भावकर्तरी प्रयोगाचें ( क्रियापद ). ०कुंडली स्त्री. ( ज्यो . ) तनु , धन इ० चीं १२ स्थानें दाखविण्यासाठीं बारा राशींचीं घरें ज्यावर दाखविलीं आहेत असें वर्तुळ . कुंडली पहा . ०गर्भ पु. ग्रंथांतील सारांश . अंतस्थ हेतु . ०गर्भ गर्भित - वि . ध्वनित ; गर्भित अर्थाचा . ध्वनित अर्थ ज्यांत आहे असें ; दिसतो त्यापेक्षां अधिक अर्थ असलेलें ( भाषण , लेख इ० ). ०चलित वि. ( ज्यो . ) तन्वादिस्थानीं असून अंशे करुन चलित झाला तो ( सूर्य किंवा इतर ग्रह ). ०भक्ति भगत - स्त्री . मनःपूर्वक , श्रद्धा - प्रेमयुक्त , निष्कामपणें केलेली भक्ति ; याच्या उलट भयभक्ति . एखाद्याविषयीं वाटणारें अत्यंत प्रेम ; मनाची ओढ . ०वाचक - न . ( व्या . ) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुणधर्माचा बोध करुन देणारें नाम . [ सं . ] नाम - न . ( व्या . ) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुणधर्माचा बोध करुन देणारें नाम . [ सं . ] ०वाचकसंख्या स्त्री. जात नसणारी संख्या ; संख्या किंवा परिमाणें यांचा हिस्सा , पट . ०शबल न. भावनाविकारांचा गोंधळ . कालवाकालव ; अनेक रसांचें मिश्रण . - वि . गोंधळलेल्या भावनांचा . [ सं . ] ०शुद्धि स्त्री. अतःकरणशुद्धि . तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरलें विकल्पाचे कांटे । - ज्ञा ७ . १७० . ०संकर पु. मिश्र , संकीर्ण भावना , मनोविकार . [ सं . ] ०संधि पु. निरनिराळ्या , परस्परविरुद्ध भावना असलेल्या मनाची धरसोडपणाची अवस्था ; अंतःकरणांतील मिश्र रसप्रकार . [ सं . ] ०ज्ञ वि. आशय , अभिप्राय जाणणारा ; गुणज्ञ . पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे । - ज्ञा ६ . २१ . भावांतर न . अर्थांतील फरक , विसंगतपणा . [ सं . भाव + अंतर ] भावाभाव पु . अस्तित्वनास्तित्व ; खरेंखोटें ; चैतन्य आणि जड . भावाभावारुप स्फुरे । दृश्य जें हें । - ज्ञा १८ . ११८६ . [ सं . भाव + अभाव ] भावाभास पु . कृत्रिम प्रेम ; कवि किंवा नाटककार यांनीं केलेलें प्रेमाचें खोटें वर्णन किंवा प्रदर्शन . चुकीचा समज , ग्रह , कल्पना . [ भाव + आभास ] भावार्थ - पु . तात्पर्यार्थ ; सारांश . भक्तिसार . ग्रंथ वदावया निरुपणीं । भावार्थ - खाणी जयामाजी । - व्यं २ . श्रद्धा ; विश्वास ; भाव . जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । - दा १ . १ . ३८ . अंतःकरणाची निष्कपट वृत्ति ; प्रामाणिकपणा . - क्रिवि . खरोखर ; निःसंशय . तो भावार्थ गांवास गेला , मी आपल्यापाशीं का खोटें सांगेन भावार्थी - वि . भाविक . साधा ; भोळा ; सरळ स्वभावाचा . भाविक , भावीक - वि . श्रद्धावान ; निष्ठावंत . संतुष्ट होणारा . तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । - ज्ञा ३ . १०४ . भक्तियुक्त अंतःकरणाचा . भाविकजन , भावीकजन , भावीजन - पु . श्रद्धायुक्त , निष्ठावंत अंतःकरणाचा मनुष्य . अद्यापि दीपाचे झळळाळ । भावीकजन देखति । भावित - वि . कल्पिलेलें ; चिंतिलेलें ; कल्पित . ज्यावर भावना किंवा संस्कार केले आहेत असें ( औषध ). [ सं . ] भाविला - वि . संस्कार केलेला . - शर . भावी , वे प्रयोग - पु . ( व्या . ) जेथें कर्त्यावरुन अथवा कर्मावरुन क्रियापद बदलत नाहीं व सामान्यतः त्याचें रुप नपुसकलिंगी एकवचनी असतें असा प्रयोग . मीं त्यास मारिलें . भावुक - न . श्रृंगारिक बोलणें . कल्याण ; हित ; क्षेम . ऐसा भक्तमयूर चातकहि जो नेणें दुजीं भावुकें । - मोकृष्ण ५५ . ५१ . भावुक , भावूक - वि . भक्तियुक्त ; निष्ठावंत ; भाविक . असोत तुज आमुचीं सकल भावुकायुर्बळें । - केका ६४ . भावेभक्ति - स्त्री . भावभक्ति पहा . भावो - पु . भाव पहा . म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । - ज्ञा १० . १४१ . भावो सरणें - वाटूं लागणें . - शर . तेथ आदिसा पासौनि पार्था । आइकिजे ऐसीचि अवस्था । दुणावली हे यदुनाथा । भावों सरलें । - माज्ञा ६ . ४८७ . ( पाठ ). भाव्य - वि . उपासना करण्यास योग्य . जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा । - ज्ञा ९ . ८४ .
|