Dictionaries | References

मळणें

   
Script: Devanagari

मळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
To contract dirt; to get dirtied.

मळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Beat out. Squeeze; knead. Fig. Tread out.
v i   Get dirtied.

मळणें     

सक्रि
धान्य कणसांतून तुडवून , झोडपून बाहेर काढणें ; तुडविणें ( धान्य ).
( गुर्‍हाळघर , कों . ) ऊंस चरकांत घालून रस काढणें , पिळणें . गूळ मळणें = गूळ तयार करणें .
तिंबणें ; मऊ करणें ( कणीक ).
चेपणें ; रगडणें ; चोळणें ( हात , पाय इ० ).
( घोड्याला ) खरारा , मालीश करणें .
अंगास उटी , उटणें लावणें .
( ल . ) रहदारीनें वाट पाडणें ; रस्ता रुळविणें ; ( मार्ग मळणें ). मळलेला मार्ग सोडून आपला मुलगा किंचित बाजूला गेला . ... - केले १ . ३१२ . [ सं . मर्दन ; प्रा . मलन ; पं . मळना ; गु . मळवुं : हिं . मलना ; सिं . मलवुं ] मळण - न .
( राजा . ) उंसाचा रस गुळासाठीं कढविणें .
गूळ घर ; गूळ तयार करण्याची जागा . मळणकर - पु . मळणी करणारा ; धान्य मळणारा . [ मळणी + कर ] मळणतळण - न . स्वयंपाकाचीं कामें ( सर्व साधारण ); कणीक तिंबणें , तळणें इ० कामें मळणी - स्त्री .
कणसें झोडपून , बैलाकडून तुडवून धान्य काढणें . ( क्रि० काढणें ; करणें ; घालणें )
उंसाचा रस काढण्याची क्रिया .
( ल . ) मळणीचा हंगाम .
०घालणें   धिंगामस्ती ; धांवाधांव करणें ; धुळींत खेळणें ( लहान मुलांनीं ) मळणीवर येणें कांहीं एक पदार्थ तयार झाल्यावर येणें ; आयत्या वेळीं येणें . मळीव वि .
मळलेलें ; झोडपलेलें ; तुडविलेलें ( धान्य ).
तिंबलेलें ; चेपलेलें ; पिळलेलें इ० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP